आयएएमएचा पदग्रहण सोहळा
By admin | Published: April 8, 2015 12:03 AM2015-04-08T00:03:07+5:302015-04-08T00:03:07+5:30
येथील गंज वॉर्डातील आय.एम.ए. सभागृहात शनिवारी चंद्रपूर इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून सर्जन डॉ. अशोक भुक्ते व सचिव म्हणून फिजीशियन डॉ. प्रसाद पोटदुखे ....
सुधीर मुनगंटीवारांचा सत्कार : १५ गरजू मुली शिक्षणासाठी दत्तक
चंद्रपूर : येथील गंज वॉर्डातील आय.एम.ए. सभागृहात शनिवारी चंद्रपूर इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून सर्जन डॉ. अशोक भुक्ते व सचिव म्हणून फिजीशियन डॉ. प्रसाद पोटदुखे यांनी मावळते अध्यक्ष डॉ. मंगेश टिपणीस व सचिव डॉ. विश्वास झाडे यांचेकडून पदभार स्वीकारला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी युएनआयसीईएफचे को- आॅर्डीनेटर डॉ. अरुण आमले होते. प्रमुख अतिथी म्हणून महापौर राखी कंचर्लावार व राज्याचे अर्थ- नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
प्रास्ताविक मावळते अध्यक्ष डॉ. मंगेश टिपणीस यांनी केले. वर्षभरात आय.एम.एतर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचा सचित्र अहवाल मावळते सचिव डॉ. विश्वास झाडे यांनी सादर केला. तद्नंतर पदग्रहण सोहळ्याचे औचित्य साधून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आय.एम.ए. परिवारातर्फे शाल श्रीफळ व मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ना. मुनगंटीवार यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना व सभासदांना शुभेच्छा दिल्या.यावेळी चंद्रपूर आय.एम.ए.ने सुरू केलेल्या शिक्षण मंगल सुकन्या योजनेअंतर्गत १५ डॉक्टरांनी १५ गरजु सुकन्या शैक्षणिक मदतीसाठी दत्तक घेतल्या.
पाहुण्यांचा परिचय डॉ. स्नेहल पोटदुखे व डॉ. नरेंद्र कोलते यांनी करून दिला. संचालन पियूष मुत्यालवार व डॉ. प्रीती चव्हाण यांनी केले. आभार सचिव डॉ. प्रसाद पोटदुखे यांनी मानले. या कार्यक्रमाला शहरातील डॉक्टर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)