नियोजनपूर्वक प्रयत्नाने आयएएस शक्य

By admin | Published: September 14, 2016 12:47 AM2016-09-14T00:47:23+5:302016-09-14T00:47:23+5:30

कोणतीही परीक्षा कठीण नसते. त्या परीक्षेवर लक्ष केंद्रीत करुन नियोजनपूर्वक प्रयत्न व अभ्यासातील सातत्यामुळे नक्कीच यश प्राप्त होते.

IAS possible with a planned effort | नियोजनपूर्वक प्रयत्नाने आयएएस शक्य

नियोजनपूर्वक प्रयत्नाने आयएएस शक्य

Next

अमन मित्तल : युपीएससीबाबत पोलीस मुख्यालयात मार्गदर्शन
चंद्रपूर : कोणतीही परीक्षा कठीण नसते. त्या परीक्षेवर लक्ष केंद्रीत करुन नियोजनपूर्वक प्रयत्न व अभ्यासातील सातत्यामुळे नक्कीच यश प्राप्त होते. त्यामुळे आयएएस होणे फार अवघड बाब नाही, असे प्रतिपादन आयएएस अधिकारी अमन मित्तल यांनी केले.
स्पर्धा परीक्षा हा यशाचा खात्रीशेर मार्ग आहे. अट आहे ती फक्त योग्य व अथक परिश्रमांची व ही जाणीवच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने पोलीस अधीक्षक संदीप दिवान यांच्या पुढाकाराने ‘आयएएस अवघड आहे, अशक्य नाही’, या युपीएससी स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन व्याख्यान पोलीस मुख्यालय ड्रील शेड येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मित्तल बोलत होते.
अमन मित्तल यांनी अगदी सोप्य भाषेत परीक्षेच्या स्वरूपाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मनात कोणताही न्यूनगंड व भीती न बाळगता कशाप्रकारे या परीक्षेला सामोरे जावे, या बाबतच्या त्यांनी विद्यार्थ्यांना टीप्स दिल्या. त्यांनी उपयुक्त अशा पुस्तकांची नावेसुद्धा सांगितली. सुरूवातीपासून ते इंटरव्ह्यूपर्यंतची आपल्या अभ्यासाची पद्धत कशी असावी, हे त्यांनी समजविले. उपस्थित विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न मित्तल यांच्या समोर मांडले. त्यांनी त्यांचे समाधान अगदी सोप्या भाषेत केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान यांनी स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सहा. पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत व उपपोलीस अधीक्षक जयचंद्र काठे हे प्रामुख्याने हजर होते. (प्रतिनिधी)

ुजिल्ह्यातील युवकांनी ध्येय गाठावे
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून आपल्या जिल्ह्ययातील तरुणांचा कल, त्यांची आवड याबाबत अभ्यास केल्यानंतर जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेकडे वळलेले बरेच विद्यार्थी आढळले. परंतु त्यांचे ध्येय हे फार सीमित आहे. बरेच विद्यार्थी हे केवळ पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक किंवा पीएसआय, एस.टी.आय. या परीक्षेपुरता मर्यादित अभ्यास करतात. फार कमी युपीएससीच्या परीक्षेकडे वळतात. त्यामागील कारणाचा विचार करता युपीएससी परीक्षेबाबत न मिळणारे मार्गदर्शन व अभ्यासाबाबत असलेली भीती दूर करुन आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीसुद्धा युपीएससी सारख्या परीक्षेचा अभ्यास करावा व त्यात यश संपादन करावे, या हेतूने जिल्ह्यात प्रोबेशन कार्यकाळाकरिता नियुक्त झालेले आयएएस अधिकारी अमन मित्तल यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

Web Title: IAS possible with a planned effort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.