गैर आदिवासीत ऐश्वर्या मोटे तर आदिवासी गटात सुमित बिजे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 10:15 PM2019-01-11T22:15:34+5:302019-01-11T22:16:43+5:30
राज्य विज्ञान शिक्षण संस्था व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ४४ वे जिल्हास्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शन माऊंट सायन्स महाविद्यालय येथे घेण्यात आले. या प्रदर्शनात एकाहून एक सरस प्रतिकृती विद्यार्थ्यांना सादर केल्या होत्या. यात प्राथमिक गैर आदिवासी गटात ऐश्वर्या माटे व आदिवासी गटात सुमित बिजे यांच्या प्रतिकृती प्रथम आल्या आहेत. प्रदर्शनात एकूण १९५ विज्ञान प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : राज्य विज्ञान शिक्षण संस्था व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ४४ वे जिल्हास्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शन माऊंट सायन्स महाविद्यालय येथे घेण्यात आले. या प्रदर्शनात एकाहून एक सरस प्रतिकृती विद्यार्थ्यांना सादर केल्या होत्या. यात प्राथमिक गैर आदिवासी गटात ऐश्वर्या माटे व आदिवासी गटात सुमित बिजे यांच्या प्रतिकृती प्रथम आल्या आहेत. प्रदर्शनात एकूण १९५ विज्ञान प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या.
‘जीवनातील आव्हानासाठी वैज्ञानिक उपाय’ या विषयावर हे प्रदर्शन असून त्या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रतिकृती बनविल्या होत्या. विज्ञानातून मानवाच्या दैनंदिन जीवनात कशी प्रगती करता येईल, या बाबती प्रतिकृतीतून भर देण्यात आला होता. या प्रदर्शनात उच्च प्राथमिक वर्ग ६ ते ८ गैरआदिवासी गटात प्रथम क्रमांक जि.प. उ.प्रा. शाळा मूर्तीची ऐश्वर्या एकनाथ मोटे हिने पटकावला. द्वितीय बल्लाजी हॉयस्कूल बामणीचा हर्षल सुरेश दुरतकर, तृतीय क्रमांक शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल नांदाफाटाची दिशा प्रफुल्ल दारवटकर हिने पटकावला. उच्च प्राथमिक वर्ग ६ ते ८ आदिवासी गटात प्रथम क्रमांक सुमित बालाजी बिजे याने पटकाविला. माध्यमिक वर्ग १ ते १२ गैरआदिवासी गटात प्रथम क्रमांक प्रेम गणपत देवगट्टा, द्वितीय साजल वाळके, तृतीय शिवाजी संतोष शिंपलीवार यांनी पटकाविला. आदिवासी गटात प्रथम क्रमांक शुभम देवाजी सातपुते यांनी पटकाविला. प्राथमिक शिक्षक गटात बाबा देवराव कोडापे व मनीष अशोक मांडवकर यांना संयुक्तपणे प्रथम क्रमांक देण्यात आला असून माध्यमिक शिक्षक व शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये सुरेशकुमार भगत, माध्यमिक शिक्षक लोकसंख्या शिक्षकमध्ये सलमा सप्तार कुरेशी व प्रायेगशाळा परिचर सहाय्यकमध्ये गणेश बदखल यांना प्रथम क्रमांक देण्यात आला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना समारोपीय कार्यक्रमात शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. संचालन अरुंधती गावटकर व आभार प्रदर्शन साधना केगतपूरे यांनी केले.