बसेस सुरु न केल्यास आंदोलन

By Admin | Published: July 14, 2014 01:57 AM2014-07-14T01:57:09+5:302014-07-14T01:57:09+5:30

दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळा- महाविद्यालये सुरू झाल्याबरोबर

If the buses do not start the movement | बसेस सुरु न केल्यास आंदोलन

बसेस सुरु न केल्यास आंदोलन

googlenewsNext

विद्यार्थ्यांचा इशारा : महामंडळाचे नियोजनच नाही
गडचांदूर :
दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळा- महाविद्यालये सुरू झाल्याबरोबर विद्यार्थ्यांना बसची समस्या भेडसावू लागली आहे. एकही बस वेळेवर नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळा शिकावायची कशी अशा विवंचनेत पालकवर्ग सापडला आहे. गडचांदूर बसस्थानकावर ११.३० ला शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना ४ ते ५ वाजेपर्यंत उपाशीपोटी बसची वाट पाहत उभे राहावे लागते. येत्या दोन दिवसात बसचे नियोजन करुन बसेस उपलब्ध करुन न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
गडचांदूर आगाराकाडे बसेस उपलब्ध असताना नियोजनाअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. दरवर्षी ही गैरसोय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना आगार प्रमुखांकडे निवेदने द्यावी लागतात ही शोकांतिका आहे. नांदा, बिबी, कोरपना, लोणी, अंतरगाव, सांगोडा, गाडेगाव, वनसडी, नारंडा, वडगाव, खिर्डी, इंजापूर, धामगाव, बाखर्डी, कवठाळा, निमणी, आवारपूर इत्यादी गावातील विद्यार्थी सकाळ व दुपार पाळीत गडचांदूर येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. वेळेच्या अगोदर किंवा नंतर अर्ध्या- एक तासाच्या अंतरावर बसेस सुटून जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोय व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
एकीकडे शासन विद्यार्थ्यांसाठी बालकांना मोफत व शिक्षणाचा अधिकार अधिनियम तयार करुन लागू करीत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना बस उपलब्ध नसल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करीत आहे. मग शासनाचा नियम लागू कसा होणार असा सवालही विद्यार्थी करीत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता कोरपना, गाडेगाव, व भोयगाव व राजुरा येथून सकाळी ६ वाजून ३० मिनिटानी बस सुटल्यास ७ वाजता गडचांदूर येथे पोहचते. तसेच गडचांदूर येथून सदर बसेस १२ वाजता सुटल्यास सर्वविद्यार्थ्यांना सोयीचे होते.
विद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता कोरपना, भोयगाव व राजुरा येथून सकाळी १० वाजून ४५ मिनिटानी व पालगाव- नांदाफाटा येथून ११ वाजता बस सुटल्यास ११.१५ वाजता गडचांदूर येथे पोहचते. तसेच गडचांदूर येथून सदर बसेस ५.३० वाजता सुटल्यास सर्व विद्यार्थ्यांना सोयीचे होते. यासाठी आगाराला नवीन बसेस सुरु करण्याची गरज नसून बसेस उपलब्ध आहे. फक्य नियोजन करण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)
पालगाव बसचा थांबाबिबी येथे द्यावा
पालगाव बस नांदाफाटा येथून सुटतात. नांदाफाटा ते गडचांदूरच्या मध्यभागी फक्त बिबी येथे एकच थांबा असतो. येथून रोज २० ते ३० विद्यार्थी गडचांदूर येथे श्क्षिणासाठी जातात. मात्र नागपूर, साकोली आगाराच्या जलद बस असल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्यांना वाकुल्या दाखवत निघून जातात. त्यामुळे या बसचा थांबा बिबी येथे देण्यात यावा.
मानवविकास मिशनचे काय?
राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा व जिवती या तालुक्याचा मानव विकास मिशनमध्ये समावेश झाल्याने मुलींना १२ वीपर्यंत बस पास मोफत असतात. मात्र राजुरा तालुक्यातील गावातून कोरपना तालुक्यातील गावापर्यंत प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसपास मोफत मिळत नाही. त्यामुळे राजुरा आगाराने नेमकी योजना कशी आहे. याबद्दल विद्यार्थीनींना माहिती देऊन निदान राजुरा तालुक्यातील चंदनवाही, हरदोना (खु.), हरदोना (बु.) या गावातील विद्यार्थीनींना गडचांदूरपर्यंत येण्यासाठी मोफत बसपास योजनेचा लाभ मिळायला पाहिजे. कारण ही गावे राजुरा तालुक्यात येतात आणि राजुरा तालुक्याचा समावेश मानव विकास मिशनमध्ये झाला आहे.
थांबा असणाऱ्या बसेस द्या
राजुरा, कोरपना, भोयगाव व पालगाव याठिकाणाहून येणाऱ्या सर्व बसेस प्रत्येक गावात थांबा असणाऱ्या असाव्या, कारण अनेक बसेस खाली असतात. मात्र थांबा नसल्याने रस्त्यावर असलेल्या गावातील विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहचता येत नाही. त्यामुळे थांबा असणाऱ्याच बसेस देण्यात यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

Web Title: If the buses do not start the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.