प्रामाणिक मेहनत केल्यास यशप्राप्ती निश्चित मिळेल

By admin | Published: October 5, 2015 01:36 AM2015-10-05T01:36:02+5:302015-10-05T01:36:02+5:30

माणसांच्या अंगी जिद्द आणि चिकाटी, प्रामाणिकपणे मेहनत घेण्याची ताकद असेल तर, यशाची प्राप्ती ही निश्चितच होते, असे प्रतिपादन कोरपणाचे उपविभागीय पोलीस अधिकारी ...

If done with honest effort, achievement will be guaranteed | प्रामाणिक मेहनत केल्यास यशप्राप्ती निश्चित मिळेल

प्रामाणिक मेहनत केल्यास यशप्राप्ती निश्चित मिळेल

Next

सुधीर खिरडकर : कोरपना येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर
कान्हाळगाव : माणसांच्या अंगी जिद्द आणि चिकाटी, प्रामाणिकपणे मेहनत घेण्याची ताकद असेल तर, यशाची प्राप्ती ही निश्चितच होते, असे प्रतिपादन कोरपणाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी केले. स्टुडंट फोरम ग्रुप, कोरपना द्वारा आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीधरराव गोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसभापती अशोक डोहे, संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे, प्राचार्य संभाजी वारकड, संजय ठावरी, अ‍ॅलेक्सझाड्रीना डिसुझा, डॉ.गिरीधर काळे, दिलीप मालेकर, अनिल देरकर आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये किशोर गज्जलवार, अनिल देरकर, राजू सोनपितरे, अनुप रणदिवे, चेतन कडुकर, अनशुल पोतनुरवार, भूषण लोहे, प्रतीक निरे, दिनेश ढेंगळे, सचिन गिरसावळे, अतुल पायघन, शंकर भोयर, तुषार पायघन, करिष्मा पाचभाई, ईश्वर ठावरी, नितीन धारणकर, हरबा झाडे, बाबाराव मालेकर, डॉ.वामन रणदिवे, निलकंठ भुसारी, शालिनी दुर्गे, शंकर भिसेकर, नागोबा बांदूरकर आदींचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: If done with honest effort, achievement will be guaranteed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.