ई-कचरा दिल्यास मोबदल्यात नागरिकांना मिळणार खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:52 AM2021-02-06T04:52:13+5:302021-02-06T04:52:13+5:30

चंद्रपूर : आपल्या घरात जाणते-अजाणते ई- कचऱ्याची निर्मिती होते. रिसायकल यू या ॲपद्वारे या कचऱ्याचे व्यवस्थापन शक्य आहे. ...

If e-waste is given, citizens will get fertilizer in return | ई-कचरा दिल्यास मोबदल्यात नागरिकांना मिळणार खत

ई-कचरा दिल्यास मोबदल्यात नागरिकांना मिळणार खत

googlenewsNext

चंद्रपूर : आपल्या घरात जाणते-अजाणते ई- कचऱ्याची निर्मिती होते. रिसायकल यू या ॲपद्वारे या कचऱ्याचे व्यवस्थापन शक्य आहे. नागरिकांनी मनपाकडे हा कचरा आणून दिल्यास मोबदल्यात ओल्या कचऱ्यापासून तयार होणारे खत देणार आहोत. या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार यांनी केले. रिसायकल यू ॲण्ड्रॉइड ॲपचे बुधवारी उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.

यावेळी चंद्रकला पंडित सोयाम, संतोष गर्गेलवार, दिनेश कोयचाडे, नीरज वर्मा, प्रीती बल्लावार, साक्षी कार्लेकर आदी उपस्थित होते. सध्या पर्यावरण संवर्धनासाठी सर्व पातळीवर विविध उपाययोजना सुरू आहेत; मात्र दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यासाठी ई-कचरा कारणीभूत ठरला. पर्यावरण रक्षणासाठी ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे रिसायकल यू या ॲण्ड्रॉइड ॲप सुरू करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत एएसपीएम स्वयंसेवी संस्थेने मनपासाठी या ॲपची निर्मिती केली. आपल्या घरात जाणते-अजाणते निर्माण होणारा ई- कचरा जसे कॉम्प्युटर्सचे मॉनिटर, की-बोर्ड, माऊस, मोबाइलचे खराब झालेले सुटे भाग, बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे, टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक खेळणी, घड्याळ, बंद पडलेला रेडिओ, क्षमता संपलेले सेल इत्यादी वस्तू आता मनपा स्वच्छता विभागाला देऊन त्या बदल्यात ओल्या कचऱ्यापासून तयार होणारे खत मिळविता येणार आहे.

मनपाचे पथक घरून नेणार ई कचरा

रिसायकल यू ही ॲप मोबाइलवर डाऊनलोड करून आपल्या घरातील ई- कचऱ्याचे छायाचित्र यावर टाकावयाचे आहे. लोकेशन पाहून मनपा स्वच्छता विभागातर्फे हा ई- कचरा नागरिकांच्या घरून गोळा करतील. नागरिकांनी यावर छायाचित्र टाकताच काही पॉईंट्सदेखील मिळणार आहेत. अधिकाधिक पॉईंट्स मिळविणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहनपर बक्षीस मिळेल. ई- कचरा निर्मूलनाच्या दृष्टीने सर्वानी रिसायकल यू ॲपचा वापर करण्याचे आवाहन आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.

Web Title: If e-waste is given, citizens will get fertilizer in return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.