पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास दुसरा कसा घेणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:20 AM2021-07-01T04:20:48+5:302021-07-01T04:20:48+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ८९ हजार ४०० जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये चार लाख ६३६ जणांनी प्रथम डोस ...
जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ८९ हजार ४०० जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये चार लाख ६३६ जणांनी प्रथम डोस तर ८८ हजार ८०४ जणांनी दोन्ही डोस घेतले आहे. मागील काही दिवसांपासून १८ वर्षावरील लसीकरण सुरु करण्यात आले आहे. लसीकरणासाठी गर्दी होत आहे. परंतु, ग्रामीण भागात अनेकांना लसीकरण करताना अडचणी येत असल्याची ओरड होत आहे. ज्यांना पहिला डोस घेतल्याचा मेसेज आला नाही. तसेच त्यांच्याकडे प्रमाणपत्र उपलब्ध नाही. अशांना दुसरा डोस घेताना अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरण करताना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
बॉक्स
मेसेजच आला नाही
कोरोनाचा पहिला डोस घेतला. मोबाईल नंबरसुद्धा सांगितला. परंतु, मेसेज आला नाही. तसेच संबंधित केंद्रावर प्रमाणपत्रसुद्धा मिळाले नाही. केंद्रावरील व्यक्ती दुसरा डोस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन होत नसल्याचे सांगत. त्यामुळे दुसरा डोस घ्यायचा कसा, असा प्रश्न ग्रामीण भागात उपलब्ध होत आहे. याबाबत केंद्रावरील कर्मचारीसुद्धा माहिती देत नसल्याने आम्ही लस कशी घ्यायची, असा प्रश्न ग्रामीण भागातून विचारण्यात येत आहे.
बॉक्स
लसीकरणाच्या वेळी ही घ्या काळजी
लसीकरण करताना केंद्रावर आपले नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर व्यवस्थित द्यावा, आपण दिलेली माहिती योग्य भरली की नाही याची शहानिशा करावी, लस घेतल्यानंतर मेसेज आला की नाही ते तपासून बघावे, मेसेज आला नसल्यास त्याबाबत माहिती द्यावी, लस घेतल्यानंतर प्रमाणपत्राची मागणी करावी, आदी काळजी घेणे गरजेचे आहे.
---
कोट
रजिस्ट्रेशन करताना योग्य माहिती द्या
केंद्रावर लसीकरण करताना योग्य माहिती द्यावी. जर नंबर चुकीचा सांगितला असेल तर ज्या दिवशी लस घेतली त्याची तारीख माहीत असल्यास संबंधित केंद्रावरील साईटवर आपण नाव तपासून नंबर शोधू शकतो. त्यानंतर त्या नंबरच्या आधारावर लस घेता येऊ शकते. कोरोनावर लस हेच प्रभावी उपाय असल्याने सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे आहे.
डाॅ. संदीप गेडाम, जिल्हा लसीकरण अधिकारी, चंद्रपूर
बॉक्स
पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास...
पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जावे. लस घेतल्याचा पुरावा असेल तर आरोग्य विभागाशी संपर्क साधून ते प्रमाणपत्र मागावे. जर नंबर चुकीचा असल्यास केंद्रावरील कर्मचाऱ्यांना लगेच माहिती द्यावी. त्यानंतर ते सुधारित नंबर आपणाला देतील त्यावरुन आपणाला दुसरा डोस घेता येऊ शकते.