स्मार्टफोन नाही तर, पीक नोंदणी करावी कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:26 AM2021-09-13T04:26:36+5:302021-09-13T04:26:36+5:30
पळसगाव : गाव नमुना सातबारावर तलाठ्याकडून पिकांची नोंद केली जात होती. या नोंदणीच्या आधारावर शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले ...
पळसगाव : गाव नमुना सातबारावर तलाठ्याकडून पिकांची नोंद केली जात होती. या नोंदणीच्या आधारावर शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. आता महसूल विभागाने डिजिटल तंत्राद्वारे नवे ई-पीक पाहणी ॲप तयार करण्यात आले आहे.
ई-पीक पाहणीद्वारे शेतातील पिकांची नोंद शेतकऱ्यांना स्वतः शेतात जाऊन करायची आहे. न केल्यास सातबारामधील पीक पेरा कोरा राहील. यामुळे कोणतीही शासकीय मदत, पीक विमा, पीक कर्ज, अनुदान प्राप्त होणार नाही. हे सर्व करण्यासाठी शेतकऱ्यांना स्मार्टफोनची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु ग्रामीण भागात ८० टक्के शेतकऱ्यांकडे ॲन्ड्रॉइड मोबाईलच नाही आणि बहुतांश शेतकरी अशिक्षित असल्याने त्यांना मोबाईलचे ज्ञानही नाही आहे. ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करायचा कुठून, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.