जबरानजोत धारकांचा मोर्चा कचेरीवर धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:52 PM2017-09-14T22:52:55+5:302017-09-14T22:53:30+5:30

देशभर शेतकºयांच्या आत्महत्या वाढतच आहेत. उद्योगपतींना एन.पी.ए.च्या नावाखाली प्रचंड कर्जमुक्ती दिली जाते.

If the people of the caste hit the front of the factory | जबरानजोत धारकांचा मोर्चा कचेरीवर धडकला

जबरानजोत धारकांचा मोर्चा कचेरीवर धडकला

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाचा निषेध : महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : देशभर शेतकºयांच्या आत्महत्या वाढतच आहेत. उद्योगपतींना एन.पी.ए.च्या नावाखाली प्रचंड कर्जमुक्ती दिली जाते. मात्र शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी नाकारली जाते. शेतकºयांच्या पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळत नाही. देशात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाही. कसत असलेल्या वनजमिनी जबरानजोत धारकांच्या नावाने केल्या जात नाही. शासनाच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी शेतकरी, शेतमजूर, जबरानजोत धारकांचा मोर्चा
ब्रह्मपुरी एसडीओ कार्यालयावर धडकला.
महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने ७ ते १६ सप्टेंबर या कालावधीत राज्यात संघर्ष यात्रा काढली आहे. विदर्भात ७ सप्टेंबरपासून पारशिवनी नागपूर पासून या यात्रेला सुरूवात झाली असून १३ सप्टेंबर रोजी ब्रह्मपुरी शहरात यात्रा पोहचताच हजारो शेतकरी, शेतमजूरांनी हातात झेंडे घेऊन शिवाजी चौकात दुपारी ३.०० वाजता यात्रेचे स्वागत केले.
तत्पुर्वी महाराष्ट्र राज्य किसान सभा शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने शेतकरी, शेतमजूर व जबरानजोत धारकांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन किसान नेते विनोद झोडगे, नामदेव नखाते, श्रीधर वाढई, देवराव खानखुरे, कुंदा कोहपरे, बाळकृष्ण दुमाने, सुधीर खेवले, मनोहर आदे, श्रीराम हजारे, दिवाकर झाडे, मिलींद मेश्राम, राजू मोटघरे यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी शेतमजूरांनी दुपारी २.०० वाजता हुतात्मा स्मारक येथून मोर्चा काढला.
सरकार विरूध्द घोषणाबाजी करत व हातात लाल झेंडे घेऊन ब्रह्मपुरी एस.डी.ओ. कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन एसडीओ काळे, तहसिलदार चव्हान यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री देवेंद्र फ डणविस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठविले व मागण्यांविषयी चर्चा केली. यामध्ये शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करून ७/१२ कोरा करा, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा व शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्या, सर्व जबरानजोत धारकांना जमिनीचे पट्टे व घराचे पट्टे द्यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.

Web Title: If the people of the caste hit the front of the factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.