विसापूरचा पांदण रस्ता झाल्यास शेतकऱ्यांना साेयीचे होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:22 AM2021-07-17T04:22:44+5:302021-07-17T04:22:44+5:30
सुभाष भटवलकर विसापूर : बऱ्याच वर्षांपासून रखडलेला ४०० मीटरचा पांदण रस्ता नांदगाववासीयांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषदेच्या निधीमार्फत पूर्ण करण्यात ...
सुभाष भटवलकर
विसापूर : बऱ्याच वर्षांपासून रखडलेला ४०० मीटरचा पांदण रस्ता नांदगाववासीयांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषदेच्या निधीमार्फत पूर्ण करण्यात आला. या परिसरातील पूर्ण होणारा हा एकमेव पांदण रस्ता आहे, अशी माहिती पंचायत समिती सदस्य गोविंदा पोडे यांनी दिली. पांदण रस्ता समस्येमुळे शेतकरी हैराण होते. रस्त्यावरील शेतकऱ्यांचे अतिक्रमण, पावसामुळे झालेला चिखल यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे दुरापस्त झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शिवारातून बैलगाडी जात असल्याने त्यांच्यात वाद निर्माण होऊ लागले. पांदण रस्ता पूर्ण झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. विसापूर येथील पांदण रस्ता तयार करून या रस्त्याशी जोडल्यास बल्लारपूरला, तसेच नव्याने होत असलेल्या कोलगाव-विसापूर पुलामुळे शेतकऱ्यांना आपला भाजीपाला व इतर माल थेट राजुराच्या बाजारात नेता येऊ शकतो, याकडे विसापूरच्या लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.
160721\img20210625105409.jpg
नांदगाव येथील तयार करण्यात आलेला पांदण रस्ता.