नागरिकांची इच्छाशक्ती असेल तर गावाचा सहज कायापालट!
By admin | Published: February 7, 2017 12:34 AM2017-02-07T00:34:58+5:302017-02-07T00:34:58+5:30
गावकऱ्यांची व युवक- युवतींची ईच्छाशक्ती मोठी असेल तर गावाचा कायापालट व्हायला वेळ लागत नाही, ...
बाबासाहेब वासाडे : फिस्कुटी येथे श्रमसंस्कार शिबिर
मूल : गावकऱ्यांची व युवक- युवतींची ईच्छाशक्ती मोठी असेल तर गावाचा कायापालट व्हायला वेळ लागत नाही, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सहकार महर्षी अॅड. बाबासाहेब वासाडे यांनी केले.
कर्मविर महाविद्यालय मूलतर्फे फिस्कुटी येथे ‘पर्यावरण संवर्धन व ग्रामोन्नतीकरीता युवाशक्ती’ या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव अॅड. अनिल वैरागडे, उपाध्यक्ष डॉ. राममोहन बोकारे, पं. स. सदस्य संजय मारकवार, सरपंच कल्पना निकेसर, प्राचार्य डॉ. अजाबराव वानखेडे, माजी प्राचार्य ते.क. कापगते, उपसरपंच तुळशीराम मोहुर्ले सर्व सदस्य व सुज्ञ नागरिक उपस्थित होते.
रासेयो विद्यार्थ्यांनी श्रमदानातून रस्ते, नाल्या स्वच्छ केल्या व रस्त्याच्या कडेला ७५ झाडांचे वृक्षारोपण केले. शिबिराचा समारोप शि.प्र.मं. मूलचे सहसचिव दिनकरराव एडलावार यांच्या अध्यक्षतेखाली व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम कामडे, प्राचार्य डॉ. अ. ह. वानखेडे यांच्या उपस्थितीत झाला.
शिबिर काळात विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा आढावा शिबिर प्रमुख प्रा. डॉ. अनिता वाळके यांनी कथन केला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. अ.ह. वानखेडे यांनीही शिबिर यशस्वीतेबद्दल गावकऱ्यांचे आभार माणून फिस्कुटी येथील ग्रामस्वच्छतेबद्दल पुढाकार घेतलेल्या मुलींचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचालन अमर निकोडे यांनी तर आभार प्रा. प्रविण उपरे यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)