खबरदारी पाळल्यास कोरोनाविरूद्धचा लढा जिंंकणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 AM2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:00:54+5:30
प्रशासनाशी बांधिलकी कायम ठेवून कर्तव्याला प्राधान्य देत कोरोनाविरूद्ध लढाई जिंकण्यासाठी ते दोन महिन्यापासुन मैदानात उतरले आहेत. प्रशासकीय कर्तव्य बजावताना नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका आहे. नागपूर शहरात कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ४०.४ टक्के तर राज्यात करोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण २६.३ टक्के आहे.
घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : कोरोना वायरसमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली. या साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजबद्ध उपाययोजना सुरू आहेत. नागरिकांनी खबरदारी पाळल्यास कोरोनाविरूद्ध लढा हा देश निश्चितपणे जिंकू शकतो असे मत नागभीडचे सुपूत्र तथा नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. जयस्वाल यांचा जन्म नागभीड येथे झाला. १२ वी पर्यंत शिक्षण येथेच पूर्ण केले. वडील नागभीड येथे रेल्वे विभागात नोकरीला होते. डॉ. जयस्वाल यांनी काही वर्ष गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवा दिली. प्रशासनाशी बांधिलकी कायम ठेवून कर्तव्याला प्राधान्य देत कोरोनाविरूद्ध लढाई जिंकण्यासाठी ते दोन महिन्यापासुन मैदानात उतरले आहेत. प्रशासकीय कर्तव्य बजावताना नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका आहे. नागपूर शहरात कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ४०.४ टक्के तर राज्यात करोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण २६.३ टक्के आहे. मात्र नागपूर येथे कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्के आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करा, असे आवाहन डॉ. जयस्वाल यांनी केले.
जुन्या मित्रांशी संवाद कायम
आरोग्य उपसंचालक डॉ.जयस्वाल यांची नाळ अजूनही नागभीड शहराशी जुळली आहे. शैक्षणिक जीवनातील त्यांचे अनेक मित्र आहेत. मित्रांशी त्यांचा कायम संवाद असतो. प्रशासकीय व्यस्त जीवनातही ते वेळ काढून शहरात येतात.
आरोग्य सेवेत ‘टिमवर्क’ चे भान ठेवा
आरोग्य क्षेत्रात सेवा देण्यासाठी टीमवर्क महत्त्वाची असते. प्रत्येक शासकीय विभागांचा यात सहभाग असतो. कोरोनाचा प्रतिकार करण्याचे मोठे आव्हान उभे आहे. मात्र, टिमवर्कच्या माध्यमातून आरोग्य विभाग ताकदीने सामना करीत आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिली.