मुखदुर्गंधी, श्वासदुर्गंधी, थकवा असेल तर हे आहेत कारणे, जाणून घ्या उपाय !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 15:14 IST2025-01-31T15:12:46+5:302025-01-31T15:14:30+5:30
Chandrapur : व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेने थकवा

If you have bad breath, bad breath, or fatigue, these are the causes, know the solutions!
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्या उभ्या राहतात. शारीरिक व मानसिक आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होतो. ज्यामध्ये मुखदुर्गंधी, श्वासदुर्गंधी, थकवा आणि स्मरणशक्तीची घट यासारख्या समस्यांचा समावेश होतो. या व्हिटॅमिनच्या कमी होण्यामुळे शरीरातील विविध कार्ये अयशस्वी होतात. त्यामुळे, व्हिटॅमिन बी १२ च्या कमी पातळीची वेळेत ओळखून उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
लाल रक्तपेशी (आरबीसी) तयार करण्यासाठी व्हिटॅमिन बी १२ आवश्यक असते. त्याच्या कमतरतेमुळे निरोगी लाल रक्तपेशींचा अभाव निर्माण होतो. जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी जबाबदार असतात. त्यामुळे व्हिटॅमिन बी १२ शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते.
मुख, श्वास दुर्गंधीचीही अनेकांना समस्या
व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे मुख आणि श्वास दुर्गंधीची समस्यादेखील उदभवते. तोंडातील बॅक्टेरिया आणि खराब पचन व्यवस्थेमुळे याची समस्या वाढते. वेळेत उपचार न केल्यास, या समस्येचा प्रभाव शरीरावर गंभीर होऊ शकतो.
व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेने थकवा
व्हिटॅमिन बी १२ च्या कमी पातळीमुळे थकवा आणि कमजोरी येऊ शकते. जर शरीरात याची कमी झाली, तर आपल्याला ऊर्जा कमी जाणवते. तसेच संपूर्ण शरीरात अस्वस्थता आणि अजीर्णतेचा अनुभव येतो. यासाठी व्हिटॅमिन बी १२ चा पुरवठा महत्त्वाचा ठरतो. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होतात.
व्हिटॅमिन बी १२ मेंदूसाठी आवश्यक
व्हिटॅमिन बी १२ मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मेंदूच्या कार्यामध्ये सुधारणा होते. मानसिक गोंधळ, लक्षात न राहणं आणि स्मरणशक्ती कमी होणं या समस्यांपासून बचाव होतो.
"'व्हिटॅमिन बी १२' च्या कमी होण्यामुळे शरीरात अनेक लक्षणे दिसून येतात. विशेषतः मुखदुर्गंधी आणि श्वासदुर्गंधी यासारख्या समस्या वाढतात. व्हिटॅमिन बी १२ दात आणि हिरड्यांसाठी महत्त्वाचे आहे."
- डॉ. श्रुती टोंगे, दंतरोगतज्ज्ञ, चंद्रपूर