कुत्रा-मांजरासोबत रिल्स काढाल तर दंडासोबत कारागृहात जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 04:57 PM2024-05-31T16:57:47+5:302024-05-31T16:58:14+5:30

प्रसिद्धीचा मोह येणार अंगलट : व्हिडिओ प्राप्त झाल्यास होईल कारवाई

If you pull the reels with a dog-cat, you will go to jail with a fine | कुत्रा-मांजरासोबत रिल्स काढाल तर दंडासोबत कारागृहात जाल

If you pull the reels with a dog-cat, you will go to jail with a fine

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
मागील काही वर्षांमध्ये सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओ टाकून प्रसिद्धी मिळविण्याच्या अनेकांचा प्रयत्न असतो. या हव्यासापोटी काही नागरिक प्राण्यांचा छळ करतात. या संबंधातील तक्रार प्राप्त झाल्यास किंवा व्हिडिओ व्हायरल झाल्यास संबंधितावर आता गुन्हा नोंद होऊ शकतो. राज्यात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर प्राण्यांसोबतच रिल्स काढण्यापूर्वी एकदा विचार केलेला बरा. 

प्राण्यांना मानवाकडून होणाऱ्या विनाकारण वेदना आणि त्रास टाळण्यासाठी शासनाने प्राण्यांवरील कुरता प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला न्यायालयीन दंडासोबतच कारागृहाची शिक्षासुद्धा सुनावते. कोणत्याही प्राण्याला मारणे, अपंग करणे, विष देणे, निरुपयोगी करणे, जाणून-बुजून त्याचा छळ करणे, पिंजऱ्यात कैद करून ठेवणे गुन्हा आहे.

दुधाचे प्रमाण इंजेक्शन देणे हासुद्धा वाढविण्यासाठी कारवाई होते. त्यामुळे असे रिल्स तयार गुन्हा असून करण्यापूर्ण एकदा विचार करायला हवा. असे कोणी करत असेल तर त्यांची पोलिसात तक्रार करा.


काय आहे वन्यजीव संरक्षण कायदा?
■ पाळीव प्राण्यांप्रमाणेच वन्यजीव संरक्षण कायदासुद्धा शासनाने केला आहे. वन्यप्राणी किंवा पक्ष्याची शिकार झाल्यास कारवाई होते.
■ या प्रकरणाची चौकशी वन विभागामार्फत केली जाते. त्यात दोषी आढळून आल्यास संबंधितावर कारवाई केली जाते.


आतापर्यंत किती गुन्हे दाखल?
■ प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहे. मात्र शॉर्ट व्हिडिओ बनविल्याचा सध्यातरी एकही गुन्हा जिल्ह्यात नोंद नाही. राज्यात व देशात अशा प्रकारचे अनेक
■ गुन्हे घडले आहे. असे प्रकार दिसल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी.


रिल्ससाठी प्राण्याचा छळ करणे गुन्हा
■ सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओ टाकून प्रसिद्धी मिळविण्याच्या हव्यासापोटी काही नागरिक प्राण्यांचा छळ करतात. मात्र हा गुन्हा आहे.
■ प्राण्यांसोबत क्रूरतेने वागल्यासंदर्भात कारवाई केली जाते. याचबरोबर जलचर, वन्यजीव यांचासुद्धा छळ केल्यास संबंधितावर कारवाई केली जाते.


...तर दंड आणि कारावास
प्राण्यांचा छळ करणाऱ्या व्यक्तीला दंडाबरोबरच कारावासाची शिक्षासुद्धा सुनावली जाते. गाय, बैल यांची कत्तल करण्यासाठी त्यांना क्रूरतेने वाहनात डांबून नेले जाते. या प्रकरणी गुन्हा नोंद होते.


"पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्रत्येक प्राणी, पशु-पक्ष्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. यासंदर्भात जनजागृती करणेही महत्त्वाचे आहे. प्राण्यांच्या संरक्षणासाठी कठोरात कठोर कायदा करणे आवश्यक आहे."
-बंडू धोतरे, वन्यजीवप्रेमी, चंद्रपूर

Web Title: If you pull the reels with a dog-cat, you will go to jail with a fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.