फायर आॅडिटकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 11:57 PM2017-12-09T23:57:38+5:302017-12-09T23:58:32+5:30

शहरातील ९० टक्के शाळा, महाविद्यालये व रुग्णालयांनी फायर आॅडिट केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एखादे वेळी अनुचित प्रकार घडून आग लागल्यास मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा सर्वाधिक धोका विद्यार्थी व रुग्णांना आहे.

Ignore fire attachments | फायर आॅडिटकडे दुर्लक्ष

फायर आॅडिटकडे दुर्लक्ष

Next
ठळक मुद्देमनपाने कारवाई करावी : विद्यार्थी, रूग्णांना उद्भवू शकतो धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील ९० टक्के शाळा, महाविद्यालये व रुग्णालयांनी फायर आॅडिट केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एखादे वेळी अनुचित प्रकार घडून आग लागल्यास मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा सर्वाधिक धोका विद्यार्थी व रुग्णांना आहे.
शाळा, महाविद्यालय, रुग्णालयात आगीच्या अनेक घटना घडतात. अनेकांना या आगीत जीव गमवावा लागला आहे. याची दखल घेत शासनाने जीव सुरक्षा व अग्नीसुरक्षा कलम २००६ व २००९ अधिनियमांर्तगत फायर अ‍ॅडिट करण्याचा कायदा लागू केला. या नियमाअंतर्गत सर्व शाळा, महाविद्यालयांना फायर अ‍ॅडिट करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी शासनाने १८२ एजन्सी नेमून या एजन्सीकडे आॅडिट करण्याचे काम सोपविले. एजन्सीने अ‍ॅडिट करून तसा अहवाल मनपा अग्निशमन दलाकडे सादर करायचा आहे. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी क्रॉसचेकींग करुन तसा अहवाल देणार आहेत. मात्र, याबाबत माहिती घेतली असता, अनेक शाळा व महाविद्यालयानी अ‍ॅडिटच केले नसल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाºयांना याबाबत विचारणा केली असता, काही शाळांचेच फायर अ‍ॅडिटसाठी अर्ज आल्याचे सांगितले. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, रुग्णालयात आगीची घटना घडल्यास विद्यार्थी व रुग्णाच्या जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. शहरात जवळपास ४० मनपा शाळा, ६० रुग्णालये व ५० खाजगी शाळा तर ६० च्या जवळपास रुग्णालये आहेत. यापैकी अनेक शाळा व रुग्णालयाचे आॅडिट झालेले नाही. तसेच १५ मिटर उंच इमारतीना ड्रायडंट सिस्टीम बसविणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक उंच इमारतीना अशी सिस्टम बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी आगीची घटना घडल्यास मोठा घातपात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठांनी दखल घ्यावी तसेच विद्यार्थी, रुग्णांनीही खबरदारी बाळगण्याची आवश्यकता आहे.
अनेक ठिकाणी घडल्या आगीच्या घटना
शाळा-महाविद्यालय किंवा रूग्णालयात आग लागल्याची घटना यापूर्वी अनेकदा राज्यात घडल्या आहेत. चंद्रपूर शहरात आजपर्यंत अशी घटना घडली नसली तरी उंच इमारतीमध्ये आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता फायर अ‍ॅडिट करून घेणे आवश्यक आहे.

फॉयर आॅडिट करण्यासाठी मनपाकडून दरवर्षी जाहीर सूचना काढली जाते. मात्र अनेक शाळा-महाविद्यालये तसेच रूग्णालये फायर अ‍ॅडिट करण्याकडे दुर्लक्ष करतात. जवळपास १० टक्केच शाळा-महाविद्यालय, रूग्णांलयांचे फायर अ‍ॅडिटसाठी अर्ज येत असतात. ज्यांचे अर्ज येतात. त्यांना फायर अ‍ॅडिट करून दिले जाते. मनपाच्या सर्व शाळा व रूग्णांलयांचे दरवर्षी फायर अ‍ॅडिट केले जाते. मात्र खासगी शाळा, महाविद्यालये, रूग्णालये याकडे दुर्लक्ष करतात. धोका टाळण्यासाठी फायर अ‍ॅडिट करणे आवश्यक आहे.
- पी. जे. उपगन्लावार
अग्निशमन सल्लागार, मनपा चंद्रपूर.

Web Title: Ignore fire attachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.