माजरी परिसरात अवैध उत्खनन जोरात

By Admin | Published: January 10, 2016 01:21 AM2016-01-10T01:21:26+5:302016-01-10T01:21:26+5:30

माजरी परिसरात सध्या अवैध वाळू उत्खनन जोरात सुरू आहे. यामुळे पर्यावरणविषयक अनेक समस्या निर्माण झाल्या असून अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांच्या विरोधात ...

Illegal excavation loud in the Majri area | माजरी परिसरात अवैध उत्खनन जोरात

माजरी परिसरात अवैध उत्खनन जोरात

googlenewsNext

विभागाचे दुर्लक्ष : जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन
भद्रावती : माजरी परिसरात सध्या अवैध वाळू उत्खनन जोरात सुरू आहे. यामुळे पर्यावरणविषयक अनेक समस्या निर्माण झाल्या असून अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
माजरी परिसरात शिरणा नदी, कोंढा नाला, चालबर्डी नाला, पळसघाट येथे वाळू उत्खनन केल्या जाते. या घाटांचा लिलाव करून उत्खनन करण्याचा निश्चित अवधी दिला जातो. सध्या लिलावांचा करार संपल्यामुळे सर्व नदीघाटावरील वाळू उपसा बंद आहे. असे असताना अवैध वाळू उत्खनन मात्र जोरात सरू आहे. यामुळे पर्यावरणविषयक अनेक समस्या निर्माण होत आहेत. हे उत्खनन रात्री १० वाजेनंतर तर सकाळी ६ वाजेदरम्यान केले जात आहे. अवैध उत्खननातून लाखोंची वाळू तस्करी केली जात आहे. यामुळे पाणी प्रवाहासाठी मोठा अडसर निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आतापासूनच पाणी संकटाला सामोरे जावे लागत आहे. जनावरेदेखील पाण्याच्या शोधात भटकंती करताना दिसत आहेत.
उन्हाळ्यात हा प्रश्न आणखी गंभीर होण्याची भीती अनेक जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत काही जागरूक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा माहिती दिली. मात्र, त्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी याबाबत निर्णय घेऊन परिसरातील अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी राजेश रेवते यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Illegal excavation loud in the Majri area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.