अवैध दारू विक्रेते आता सट्टा व्यवसायात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:19 AM2021-06-29T04:19:43+5:302021-06-29T04:19:43+5:30
महाराष्ट्रातील भाजप-सेना युतीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता, परंतु आता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, या ...
महाराष्ट्रातील भाजप-सेना युतीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता, परंतु आता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, या आघाडी सरकारचा काळात चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक व विक्री करण्याला मोठे उधाण आले होते. अवैध दारू विक्री करून झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेक अल्पवयीन मुले, इतर कामे करणारा मजूर वर्ग, घरातील विद्यार्थी, महिला या व्यवसायात गुंतल्या होत्या; परंतु आता दारूबंदी उठवल्यामुळे त्यांचा अवैध दारू विक्री व्यवसायाला अवकळा आल्याने हे अवैध दारू व्यावसायिक सट्टा व्यवसायाकडे वळले आहेत. त्यांचा हा सट्टा व्यवसाय भद्रावती परिसरात जोमात चालू आहे. या अवैध सट्टा व्यवसायाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.