कोडशी घाटावर रेतीचे अवैध खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:44 AM2019-06-21T00:44:52+5:302019-06-21T00:45:18+5:30

तालुक्यातील कोडशी घाटावर हजारो ब्रास रेतीचे अवैध खनन सुरू असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. जेसीबी व पोकलेनचा वापर करून हायवाच्या माध्यमातून रेती माफिया साठा करत आहेत. या गंभीर बाबीची माहिती महसूल विभागाला असूनही दुर्लक्ष केल्या जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला.

Illegal mining of sand on the Kodashi ghat | कोडशी घाटावर रेतीचे अवैध खनन

कोडशी घाटावर रेतीचे अवैध खनन

Next
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : पर्यावरणाचा ऱ्हास

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : तालुक्यातील कोडशी घाटावर हजारो ब्रास रेतीचे अवैध खनन सुरू असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. जेसीबी व पोकलेनचा वापर करून हायवाच्या माध्यमातून रेती माफिया साठा करत आहेत. या गंभीर बाबीची माहिती महसूल विभागाला असूनही दुर्लक्ष केल्या जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला.
पावसाळा सुरू होणार असल्याने सात दिवसांपासून दररोज सुमारे ९० ते १०० हायवा रेतीची वाहतूक रेती माफियांकडून होत आहे. ही रेती कोरपना येथे जुन्या आयटीआय कॉलेजजवळ विनापरवानगी साठविणे सुरू आहे. इनव्हाइस आॅनलाइन न करता एकाच खनिज परवान्यावर (टीपी) दिवसभर रेतीची उचल केली जात आहे. नुकतेच स्थानांतर झालेले तहसीलदार हरीश गाडे यांनी ट्रॅक्टर चालकांवर कारवाई करून लाखोंचा महसूल शासनाला मिळवून दिला होता. मात्र आता स्थिती बदलली. महसूल विभागाने निश्चित केलेल्या सीमांकनाच्या बाहेर उपसा करून ठिकठिकाणी रेती डम्पिंग होत आहे. नांदाफाटा येथे श्रीवास्तव कॉलनीतील शिवमंदिरासमोर, वामन चिकनकर यांच्या घराजवळील श्रीवास्तव यांच्या कार्यालयासमोर व रेल्वे लाईन श्रीवास्तवचे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात रेती डम्पिंग करण्यात आली. रेती तस्करांनी १८ लाखात कोडशी येथील रेतीचा घाट विकत घेतला. अवैध रेती खननाच्या माध्यमातून पाच कोटी किमतीच्या रेतीची उचल केली. यातून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणाची हानी होत आहे.

Web Title: Illegal mining of sand on the Kodashi ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू