अवैध सावकारी धंद्याचा पर्दाफाश

By admin | Published: November 26, 2014 11:03 PM2014-11-26T23:03:39+5:302014-11-26T23:03:39+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून कोरपना तालुक्यात अवैध सावकारी धंदे सुरू आहेत. यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सावकारी पाशात अडकल्या तर अनेकांना आपल्या मौल्यवान वस्तू सोडविता आल्या नाही.

Illegal moneylender busted | अवैध सावकारी धंद्याचा पर्दाफाश

अवैध सावकारी धंद्याचा पर्दाफाश

Next

जमीन प्रकरण : मालपाणीला अटक
लखमापूर : गेल्या अनेक वर्षांपासून कोरपना तालुक्यात अवैध सावकारी धंदे सुरू आहेत. यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सावकारी पाशात अडकल्या तर अनेकांना आपल्या मौल्यवान वस्तू सोडविता आल्या नाही. असाच प्रकार कोरपना येथील अपंग शेतकरी बिरबल छगुराम गुर्जर (७०) यांच्यासोबत घडला आहे.
गडचांदूर येथील गोपाल बन्सीलाल मालपाणी याने व्याजाने पैसे देऊन जमीन हडप केल्याची तक्रार गुर्जर यांनी कोरपना पोलिसात दाखल केली आहे. त्यानंतर सदर तक्रारीची दखल घेत मालपाणीच्या विरोधात अप.क्र. ५२/१४ कलम ४२०, ४०६ भारतीय दंड विधान सहिता सह कलम मुंबई सवकार अधिनियम १९४६ कलम ५,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून आपली जमीन परत मिळविण्यासाठी फिर्यादी बिरबल गुर्जर पोलिसांकडे धाव घेत असल्याचे समजते. याआधी १५ आॅगस्ट २०१३ रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिलेला होता. त्याच्या घरगुती आर्थिक अडचणीमुळे त्याला पैशाची गरज होती. त्यावेळी कोरपना येथे शिक्षण संस्था उभारलेल्या आणि राजकीय पुढारी म्हणून ओळख असलेल्या मालपाणीेकडे त्यांनी पैशासाठी धाव घेतली आणि आपली व्यथा मालपाणीेकडे सांगितली. त्यावेळी व्याजाशिवाय पैसे मिळणार नाही हे लक्षात घेता फिर्यादीने व्याजासह पैसे परत करण्यास होकार दिला आणि एक लाख रुपये सन २०१३ मध्ये मालपाणीकडून घेतले. त्यानंतर काही दिवसातच मालपाणीने गुर्जर यांची कोरपना येथील शेतजमीन स्वत:च्या नावे करुन घेत करारनामा लिहून दिला. त्यानंतर गुर्जर यांनी पैसे परत केले व जमीन परत मागितली. मात्र मालपाणीने गुर्जर जांना शिवीगाळ करीत यापुढे जमिनीबाबत बोलायचे नाही, असे खडसावले व जमीन परत केली नाही. (वार्ताहर)

Web Title: Illegal moneylender busted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.