सिलिंडरची अवैध विक्री, दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:09 AM2019-06-13T01:09:02+5:302019-06-13T01:09:32+5:30
सावली तालुक्यातील किसाननगर येथे एका वाहनाने आलेले दोघेजण रिकामे सिलिंडर आणा आणि भरलेले घेऊन जा, असे जाहीर सांगत होते. ही माहिती पोलिसांना मिळताच त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील ३६ सिलिंडर तसेच एक चारचाकी वाहन जप्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सावली तालुक्यातील किसाननगर येथे एका वाहनाने आलेले दोघेजण रिकामे सिलिंडर आणा आणि भरलेले घेऊन जा, असे जाहीर सांगत होते. ही माहिती पोलिसांना मिळताच त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील ३६ सिलिंडर तसेच एक चारचाकी वाहन जप्त केले आहे.
किसाननगर येथे एका चारचाकी वाहनाद्वारे सिलिंडरची वाहतूक तसेच वाहनावर लाऊडस्पिकर लावून ‘रिकामा सिलिंडर आणा आणि भरलेला घेऊन जा’ असे आवाहन करून ग्राहकांना आकर्षित केले जात होते. दरम्यान, पोलिसांनी धाड टाकली असता चालक प्रदीप रामभाऊ आत्राम (२५) रा. निलसनी पेठगाव व भास्कर सुरेश हुलके(२७) रा. निमगाव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडूल भारत गॅसचे भरलेले १६ सिलिंडर १४ हजार ४०० रुपये व रिकामे २० सिलिंडर १० हजार रुपये असे ३६ सिलिंडर जप्त करण्यात आले. एक मालवाहू किंमत चार लाख रुपये, अंगझडती दरम्यान ३ हजार ९०० रुपये, लाऊडस्पिकर, माईक, असा एकूण ४ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तायवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस स्टाफ लक्ष्मण मडावी, रमाकांत पेटकुले, दादाजी बोलीवार, उत्तम कुमरे, बंडू ताडोसे यांनी केली.