लॉकडाऊनमध्ये गावठी दारुची अवैध विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 05:00 AM2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:00:56+5:30
पवनी शिवारात एकजण मोहाची गावठी दारू बनविण्यासाठी मोहफुल सडवा साठवून ठेवला आहे. अशी महिती वरोरा पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरुन २० प्लास्टिकच्या ड्राममध्ये चार लाख रुपये किंमतीचा १००० लिटर मोहफुल सडवा जप्त करुन तिथेच नष्ट करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : वरोरा तालुक्यातील पवनी शिवारात वरोरा पोलिसांनी धाड टाकून चार लाख रुपयांचा मोहसडवा जप्त केला. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी शंकर गणपत पुसदेकर याला अटक केली आहे.
पवनी शिवारात एकजण मोहाची गावठी दारू बनविण्यासाठी मोहफुल सडवा साठवून ठेवला आहे. अशी महिती वरोरा पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरुन २० प्लास्टिकच्या ड्राममध्ये चार लाख रुपये किंमतीचा १००० लिटर मोहफुल सडवा जप्त करुन तिथेच नष्ट करण्यात आला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करुन एकला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक उमेश पाटिल, सहायक पोलीस निरीक्षक राहुल किटे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश सोनटक्के, पोहेका दाते, पोकॉ अनुप नाईक, मोहन निषाद, सुरज मेश्राम, प्रफुल्ल उमाटे, मपोकॉ रूख्मा बुटे यांच्यासह सिंदेवाही पोलिसांनी केली.
गोंडपिपरीत ४३ हजाराची दारु जप्त
वढोली : गोंडपिपरी पोलिसांनी गोंडपिपरी-गणेशपिपरी मार्गावरून एका दुचाकीसह ४३ हजार रुपयांची दारु जप्त केली आहे. याप्रकरणी कलीम सय्यद व नागेश बद्दलवार या दोघांना अटक करण्यात आली. दुचाकीवरुन दारुची वाहतूक होत असल्याची माहिती गोंडपिपरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर गणेशपिपरी मार्गावर नाकाबंदी केली. यावेळी वाहनचालकांना थांबवून तपासणी केली असता दारु आढळून आली. त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात देवेश कटरे, प्रफुल्ल कांबळे, संतोष काकडे, पुनेश्वर कुळमेथे आदींनी केली.