अल्ट्राटेक कंपनी परिसरात अवैध रेती साठवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:31 AM2021-09-12T04:31:51+5:302021-09-12T04:31:51+5:30
आवाळपूर : तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र असलेल्या पालगाव गावाजवळ अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या परिसरात झाडाझुडपांमध्ये अवैध रेतीची साठवणूक करून ती बेभाव ...
आवाळपूर : तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र असलेल्या पालगाव गावाजवळ अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या परिसरात झाडाझुडपांमध्ये अवैध रेतीची साठवणूक करून ती बेभाव विकली जात असून, शासकीय कर्मचारी रेती माफियांच्या वेसणीला बांधलेले आहेत का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कोरपना तालुक्यात शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. सध्या रेतीघाट बंद असून जिल्ह्यात रेतीचे भाव गगनाला भिडले आहेत. कोरपना तालुक्यातील सर्वच घाटांतून रेती तस्कर रेती चोरून अवैधरीत्या साठवून करून रेती विकण्याचा गोरखधंदा चालला असून संबंधित विभाग डोळेझाक करीत आहे.
अल्ट्राटेक कंपनी परिसरात साठवणूक केलेली अवैध रेती ही कंपनीचे काम करणाऱ्या ठेकेदाराची असल्याने अल्ट्राटेक प्रशासनाचे अधिकारी याबाबत अनभिज्ञ कसे, असाही प्रश्न आहे.
बॉक्स
दरवर्षी बुडतो लाखोंचा महसूल
रेती तस्करी हा गंभीर विषय बनला आहे. अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर चालत असूनही याकडे लक्ष का दिले जात नाही, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. काहीही असले तरी दरवर्षी लाखोंचा महसूल बुडत आहे.