ई सिगारेट व वेब फ्लेवरचा अवैध साठा जप्त, चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलीच कारवाई 

By परिमल डोहणे | Published: October 11, 2022 07:47 PM2022-10-11T19:47:14+5:302022-10-11T19:47:47+5:30

चंद्रपूर येथे ई सिगारेट व वेब फ्लेवरचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. 

Illegal stock of e-cigarette and web flavor has been seized in Chandrapur   | ई सिगारेट व वेब फ्लेवरचा अवैध साठा जप्त, चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलीच कारवाई 

ई सिगारेट व वेब फ्लेवरचा अवैध साठा जप्त, चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलीच कारवाई 

googlenewsNext

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील रामनगर परिसरातील दुर्गा मंदिराजवळील निशा प्रोव्हीजन व नागपूर रोडवरील टेक्स स्मोकींग या दुकानात धाड टाकून रामनगर पोलिसांनी विदेशी बनावटीचे 25 ई सिगारेट व वेब फ्लेवर असा एकूण ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त मंगळवारी जप्त करण्यात आला. याप्रकरणी दुकान चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इ सिगारेट जप्त केल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई करण्यात आली आहे. 

ई सिगारेट व वेब फ्लेवरवर राज्यात बंदी आहे. तरीही मोठ्या प्रमाणात ई सिगारेटची विक्री होत आहे. या सिगारेटमुळे कर्करोगाचा धोका अधिक असतो. महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी या ई सिगारेटच्या आहारी गेल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले आहे. रामनगर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रामनगर मधील दुर्गा मंदिरासमोरील निशा प्रोव्हिजन व नागपूर रोडवरील टेक्स स्मोकिंग या दोन दुकानात धाड टाकून झडती घेतली असता, अनुक्रमे ६ व १९ असे एकूण २५ ई सिगारेट आढळून आले. या सर्व ई सिगारेट जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, प्रशान्त शेंद्रे, किशोर वैरागडे, विनोद यादव निलेश मुळे, सतीश अवथरे, लालू यादव, विकास जुमनाके, संदीप कामडी, हिरालाल गुप्ता, विकास जाधव यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांना सिगारेटचे व्यसन
सध्या चंद्रपुर शहरामध्ये शिक्षण घेत असलेले लहान मुलांमध्ये मोठया प्रमाणात गांजा, ड्रग्स पावडर तसेच इलेक्ट्रॉनिक सिगारेटने नशा करण्याचे प्रमाण  वाढले आहे. इलेक्ट्रॉनिक सिगारेट हे पेनीसारखी दिसते व ती मुलांच्या शाळेच्या बॅगमध्ये मुले शाळेत घेउन जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्या अनुषंगाने लहान मुलांकडे आई-वडीलांनी लक्ष्य ठेवावे, असे असे आवाहन पोलीसांकडुन करण्यात आले आहे.

 

Web Title: Illegal stock of e-cigarette and web flavor has been seized in Chandrapur  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.