अवैध टँकर पार्कीग ठरत आहे नागरिकांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:25 AM2021-04-05T04:25:19+5:302021-04-05T04:25:19+5:30

आवाळपूर : कोरपना तालुक्यातील गडचांदूर - वणी राज्य मार्गावरून जाणाऱ्या आवाळपूर - नांदा फाटा मार्गावर पेट्रोल पंपजवळ रस्त्याच्या दोन्ही ...

Illegal tanker parking is becoming a headache for citizens | अवैध टँकर पार्कीग ठरत आहे नागरिकांसाठी डोकेदुखी

अवैध टँकर पार्कीग ठरत आहे नागरिकांसाठी डोकेदुखी

Next

आवाळपूर : कोरपना तालुक्यातील गडचांदूर - वणी राज्य मार्गावरून जाणाऱ्या आवाळपूर - नांदा फाटा मार्गावर पेट्रोल पंपजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजुला उभ्या असलेल्या टँकरमुळे अपघाताची शक्यता बळावली असून नागरिकांसाठी डोखेदुखी ठरत आहे.

या मार्गावरून परिसरातील गावकरी व शाळकरी विद्यार्थी तसेच कामगारांची वर्दळ असते. नांदा फाटा हे बाजारपेठचे ठिकाण असल्याने परिसरातील नागरिकांची सतत रेलचेल असते.

सायंकाळी कामगारांची सुटी होत असल्याने वर्दळ असते. त्यामुळे त्यांना आपला जीव धोक्यात घालून ये जा करावा लगत आहे.

पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष अनेक दिवसांपासून अशी अवैध पार्किंग नांदा फाटा ते आवाळपूर रस्तावर केली जात आहे. कधी कधी तर जायला रस्तासुध्दा राहत नाही, अशी पार्किंग केली असते. पोलीस प्रशासनाचे कायम लक्ष असलेल्या नांदा फाटा शहराकडे मात्र अवैध पार्किंग बाबतीत कमालीचे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.

याच मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपवरदेखील टँकरचा कब्जा निदर्शनास येते. अक्षरशः पेट्रोल पंपला घेराव केलेला दिसतो. कधी कधी तर दोन चाकी जाण्याससुध्दा जागा नसते. ही अवस्था पेट्रोल पंपवर देखील असते. याकडे देखील पोलीस प्रशासनाने जातीने लक्ष देवून टँकर पार्किंग चा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Illegal tanker parking is becoming a headache for citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.