माजरीत रेतीची अवैध वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:54 PM2018-09-25T22:54:42+5:302018-09-25T22:55:05+5:30
शिराना नदी, पळसगाव, कोंडा, चलाबर्डी नाला व वर्धा नदीच्या घाटातून दररोज शेकडो वाहनांद्वारे रेतीची अवैध तस्करी सुरू असूनही कानाडोळा केल्या जात आहे. यामुळे महसूल विभागला दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. सोमवारी माजरी शहरातून माजरी कॉलरीकडे एक रेती भरलेला टिप्पर येत होता. पोलिसांनी टिप्पर चालक गौतम संभाजी मगरे रा. शामनगर याची चौकशी केली असता रॉयल्टीच्या पावत्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिक्का नव्हता.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी : शिराना नदी, पळसगाव, कोंडा, चलाबर्डी नाला व वर्धा नदीच्या घाटातून दररोज शेकडो वाहनांद्वारे रेतीची अवैध तस्करी सुरू असूनही कानाडोळा केल्या जात आहे. यामुळे महसूल विभागला दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
सोमवारी माजरी शहरातून माजरी कॉलरीकडे एक रेती भरलेला टिप्पर येत होता. पोलिसांनी टिप्पर चालक गौतम संभाजी मगरे रा. शामनगर याची चौकशी केली असता रॉयल्टीच्या पावत्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिक्का नव्हता. ही पावती पोंभुर्णा तालुक्यातील आष्टी घाटाचे दिसून आले. दीडशे किलोमीटरवरुन येणारी टिप्पर वरोरा येथे न जाता माजरीत कसे आले हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान टिप्पर चालक पळाला असून पोलिसांनी हा टिप्पर जप्त केला आहे. माजरी पोलीस ठाण्यात यापूर्वी कार्यरत असणारे ठाणेदार कृष्णा तिवारी यांनी रेती माफियांवर अंकुश लावला होता. परंतु त्यांची बदली झाल्यानंतर रेतीची अवैध तस्करी वाढली आहे. भद्रावतीचे तहसीलदार महेश शितोडे यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, बांधकाम विभागाला पत्र देऊन रेतीचे मोजमाप करण्याचे कळविले आहे. सोमवारी रात्री टिप्पर जप्त केले.
क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहून नेणाऱ्या टिप्परचे कागदपत्र जप्त केले. पुढील कारवाईसाठी तहसीलदारांकडे अहवाल पाठविण्यात येईल.
- सदाशिव ढाकने,
ठाणेदार, माजरी