वनाधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे अवैध वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:04 PM2017-10-23T23:04:56+5:302017-10-23T23:05:19+5:30
मध्यचांदा वन विभाग चंद्रपूर येथील वन अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे वनपरिसरात अवैध वृक्षतोड व गैरप्रकारात वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : मध्यचांदा वन विभाग चंद्रपूर येथील वन अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे वनपरिसरात अवैध वृक्षतोड व गैरप्रकारात वाढ झाली आहे.
मध्यचांदा वन विभागात बल्लारशाह धाबा, कोठारी, राजुरा, विरूर, वनसडी, जिवती वन परिक्षेत्र अस्तित्वात आहे. यामध्ये वनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वन कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वन परिसराला लागून तेलंगणाची सीमा आहे. त्यामुळे तस्करापासून बचाव करण्यासाठी विशेष पथक व वनाचे नियत क्षेत्राची फेररचना करून आराजी कम करण्यात आली आहे. येथे कार्यरत कर्मचारी बºयाच वर्षापासून याच वनपरिक्षेत्रात व वन विभागात कार्यरत आहे. त्यामुळे त्यांनी आपले बिराड मुख्यालयातून हलवून सोयीच्या ठिकाणी राजुरा, चंद्रपूर, बल्लारशाह, गडचांदूर, कोरपना येथे स्थापित केले आहे. काही वन अधिकारी स्वत: मुख्यालयात राहत नाही. चंद्रपूरवरुन जाणेयेणे करतात. त्यामुळे त्याचे कार्यरत कर्मचाºयांवर नियंत्रण नाही. वन अधिकारी कार्यालयात केव्हा येतात व जातात, याची माहितीसुद्धा कर्मचाºयांना राहत नाही. त्यामुळे कामाचे नियंत्रण व मार्गदर्शनाच्या अभावापोटी वन कर्मचाºयांमध्ये मनमानीचा प्रकार वाढला आहे. त्याचा परिणाम वनाची गस्त, संरक्षण, संवर्धन, वृक्ष लागवड, शिकार, जलशिवार या कामावर होत असल्याची चर्चा सुरू आहे.
राजुरा वनपरिक्षेत्रातील सुमठाणा नियम कक्षात आंतरराज्यीय मार्गावरील लगतच्या सागवान झाडाची तस्करी करण्यासाठी तस्कराकडून तोड करण्यात आली. तस्करांचा घात पावसाने केला. पाऊस आला, ट्रक फसला व तस्कर ट्रक सोडून फरार झाले. अद्याप आरोपीचा शोध लागला नाही. त्याबद्दल आम जनता व कर्मचाºयात उलटसुलट चर्चा सुरू आहे. यापूर्वीसुद्धा तस्कराकडून तोड करण्यात आली होती.
वनसडी वन परिक्षेत्रातील पारडी वन उपक्षेत्रात यवतमाळ जिल्ह्यातील शिकाºयांनी शिकारीसाठी फासे लावले. शिकार करण्याच्या प्रयत्न करीत असताना वन मजुरांच्या अतिदक्षतेमुळे प्रकार उघडकीस आला व त्यांना सापळा रचून पकडून अटक करण्यात आली. परंतु त्यांच्याकडून यापूर्वी कितीवेळा शिकार करण्यात आली, याचा शोध घेण्यात आला नाही. त्यामुळे परिसरातील जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. पारडी परिसरातील वन्यप्राण्यांच्या संख्येत घट झाली आहे. नियमित राज्यमार्गाने जाणेयेणे करणाºयांना दिसणारे वन्यप्राणी गायब झाले आहे, हा शिकारीचा प्रकार बºयाच दिवसापासून सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
राजुरा वनपरिक्षेत्रातील सुमठाणा येथील अवैध वृक्षतोड प्रकरणातील ट्रक जप्त करण्यात आला. आरोपींचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे.
- अशोक मेडपल्लीवार
वनपरिक्षेत्राधिकारी, राजुरा