बाबूपेठ परिसरातील फर्निचर दुकानात अवैध लाकूड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:30 AM2021-09-26T04:30:47+5:302021-09-26T04:30:47+5:30
मागील १५ दिवसांपासून बाबूपेठ परिसरातील घोनमोडे व वानखेडे हे अवैध लाकूड विकत घेत असल्याचा सुगावा वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना ...
मागील १५ दिवसांपासून बाबूपेठ परिसरातील घोनमोडे व वानखेडे हे अवैध लाकूड विकत घेत असल्याचा सुगावा वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागला होता. शनिवारी पहाटे ४ वाजता आरोपींच्या घराच्या मार्गावर पाडत ठेवण्यात आली. विभागीय दक्षता वन अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी सतीश चोपडे यांनी वन विभाग मोबाईल पथक, वनपाल, वनरक्षकांसह बाबूपेठ येथील आंबेडकर नगरातील वानखेडे याच्या घरी धाड टाकली असता १ लाखाचे अवैध लाकूड आढळले. पथकाने लाकूड कटाईच्या दाेन मशीन जप्त केल्या. शेजारीच असलेल्या घोनमोडे नामक फर्निचर व्यावसायिकाकडे पाहणी केली असता तिथेही ४ गोल लठ्ठे आढळल्याने एक मशीन जप्त करण्यात आली. ही कार्यवाही मुख्य वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनात विभागीय दक्षता वन अधिकारी यांच्या नेतृत्वात वनपाल तावाडे, वासेकर, गोजे, वनकर व क्षेत्र सहायक पाथारडे तसेच वनरक्षक पठाण, दहेगावकर, देवानंद उमरे, गोधने, भीमनवार, पावडे आदींनी केली.
सर्व फर्निचर व्यावसायिकांनी विभागीय कार्यालयाकडून आवक-जावक रजिस्टर नोंदणी व बिल बुक जमा करून नियमाने कार्य करावे, अशा सूचना विभागीय दक्षता वन अधिकारी चोपडे यांनी केल्या.