आयएमएचा आज देशव्यापी संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:56 AM2020-12-11T04:56:56+5:302020-12-11T04:56:56+5:30
बाक्स आयुष डाॅक्टरांचा संपात सहभाग नाही भारतीय चिकित्सा पद्धतीच्या डाॅक्टरांच्या राष्ट्रव्यापी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन (निमा) च्या निर्णयानुसार आयुष ...
बाक्स
आयुष डाॅक्टरांचा संपात सहभाग नाही
भारतीय चिकित्सा पद्धतीच्या डाॅक्टरांच्या राष्ट्रव्यापी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन (निमा) च्या निर्णयानुसार आयुष (आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी) क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व प्रमुख संघटनांनी एकत्र येऊन आयुष कृती समिती या नावाने शिखर संघटनेची स्थापना केली. या संघटनेने ११ डिसेंबर रोजी इंडियन मेडिकल असोशिएशनने पुकारलेल्या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती निमाच्या चंद्रपूर शाखेचे अध्यक्ष डाॅ. एल. आय. सरबेरे, सचिव डाॅ. विजय भंडारी व कोषाध्यक्ष डाॅ. अमित कोसुरकर यांनी दिली. भारतीय चिकित्सा केंद्रीय परीषदेने शल्य व शालांक्यतंत्र विषयाच्या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डाॅक्टरांच्या शस्त्रक्रियेच्या अधिकारासंबंधी स्पष्टता देणाऱ्या राजपत्राच्या समर्थनार्थ गुलाबी फीत लावून कर्तव्य बजावण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सांगितले.