चंद्रपुरातील आयएमएचे कार्य सदैव अग्रणी

By admin | Published: April 24, 2017 01:06 AM2017-04-24T01:06:15+5:302017-04-24T01:06:15+5:30

संपूर्ण महाराष्ट्रात चंद्रपूर आयएमएचे काम सर्वोत्कृष्ट आहे. रूग्ण तपासणी शिबिरापासून जनकल्याणासाठी केलेले जनजागृती अभियान असोे की, ...

IMA's work in Chandrapur is always the leader | चंद्रपुरातील आयएमएचे कार्य सदैव अग्रणी

चंद्रपुरातील आयएमएचे कार्य सदैव अग्रणी

Next

सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन : पदग्रहण सोहळा
चंद्रपूर : संपूर्ण महाराष्ट्रात चंद्रपूर आयएमएचे काम सर्वोत्कृष्ट आहे. रूग्ण तपासणी शिबिरापासून जनकल्याणासाठी केलेले जनजागृती अभियान असोे की, वृक्षारोपणापासून स्वच्छता अभियान असो, चंद्रपूर आयएमएचे कार्य सदैव अग्रणी राहिले असल्याचे मत राज्याचे अर्थ व वनमंत्री, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
इंडियन मेडीकल असोसिएशन चंद्रपूरचा पदग्रहण समारोह शनिवारला गंजवार्ड स्थित आय.एम.ए. सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी नागपुरचे डॉ. प्रशांत निखाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी उपस्थित होते. आयएमएचे निर्गतमान अध्यक्ष डॉ. प्रमोद बांगडे व सचिव डॉ. पियुष मृत्यालवार यांनी मागील वर्षाच्या कार्यक्रमाच्या आढावा घेतला. त्यानंतर अनेक गणमान्य सदस्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ‘आरोग्य स्पंदन’ याचे विमोचन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपुरच्या डॉक्टरांची स्तृती करून संपूर्ण महाराष्ट्रात चंद्रपूर आयएमएचे काम सर्वोत्कृष्ट आहे अशी ग्वाही दिली. रूग्ण तपासणी शिबिरापासून जनकल्याणकारी केलेले जनजागृती अभियान असो, की वृक्षारोपणपासून स्वच्छता अभियान असो यामध्ये चंद्रपूर आयएमए सदैव अग्रणी आहे.
तसेच डॉक्टरांनी केलेल्या नागपूर ते चंद्रपूर सायकल रॅलीचे विशेष कौतूक पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केले. याप्रसंगी चंद्रीमा नामक तर पंधरवाड्यात प्रकाशित होवू पाहणाऱ्या पाक्षीला बुलेटीनच्या पहिल्या अंकाचे विमोचन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
कर्करोगावर जनजागृती करण्याकरिता दर महिन्यात मराठी भाषेत एक अग्रलेख बुलेटीन छापून समाजात वाटप करण्याचा आयएमएने निर्धार केला. यावेळी त्याच्या पहिल्या आवृत्तीचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्तनांचे कर्करोग याविषयीचे पहिले बुलेटीन जनसामान्यात वाटण्यात आले.
नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. विजय करमरकर यांनी पुढील वर्षी असेच उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. नवनिर्वाचित सचिव डॉ. मनिष मुंधडा यांनी चंद्रीमा कर्करोग संबोधित पुस्तिकाबद्दल माहिती सांगितली. यावेळी चंद्रपुरातील अनेक गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती.
यावेळी मधुसूदन रूंगठा, दामोधर सारडा, महाविर इंटरनेशनचे डॉ. संदीप मुनगंटीवार, अल्कोहोल अ‍ॅनानी मसचे डॉ. प्रमोद महाजन, सीए. सौरभ खोसला, गौरव खोसला आदी उपस्थित होते. तसेच गडचिरोली, भद्रावती, घुग्घुस व वरोराचे डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ. मनिष मुंधडा यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: IMA's work in Chandrapur is always the leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.