वाढोणा येथे उन्हाळ्याच्या पाणी समस्येवर तत्काळ उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:53 AM2021-02-28T04:53:31+5:302021-02-28T04:53:31+5:30
वाढोणा ग्रामपंचायत येथे नळयोजनेअंतर्गत दोन पाण्याच्या टाक्या असतानाही उन्हाळ्यात पाण्याची गंभीर समस्या ग्रामस्थांना भेडसावत होत होती. नागरिकांनी वारंवार तक्रारी ...
वाढोणा ग्रामपंचायत येथे नळयोजनेअंतर्गत दोन पाण्याच्या टाक्या असतानाही उन्हाळ्यात पाण्याची गंभीर समस्या ग्रामस्थांना भेडसावत होत होती. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही आजतागायत पाणीप्रश्न सुटला नव्हता. उन्हाळ्यापूर्वी येथील पाणीटंचाईची समस्या सोडविण्याची ग्वाही नवनिर्वाचित सरपंच देवेंद्र गेडाम व उपसरपंच भगवान बन्सोड गावकऱ्यांना दिली होती. सरपंच देवेंद्र गेडाम यांनी पदभार स्वीकारताच सर्वप्रथम गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाईची समस्या लक्षात घेऊन भूजल सर्वेक्षण अधिकाऱ्यांना बोलावून पाण्याची पातळी संदर्भात सर्वेक्षण करवून घेतले. त्यानंतर हातपंपाची सोय करून देण्यात आली. याप्रसंगी सरपंच देवेंद्र गेडाम, उपसरपंच भगवान बन्सोड, ग्रा. पं. सदस्य अनिल डोर्लीकर, प्रदीप येसनसुरे, वासुदेव मस्के, मंगला बोरकर, प्रियांका गजेवार, मीनाक्षी कोमावार, शशिकला ठाकरे हे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.