संविधान जाळणाऱ्यांना तातडीने अटक करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:13 PM2018-08-13T23:13:48+5:302018-08-13T23:14:03+5:30

दिल्ली येथील जंतरमंतरवर संविधान जाळून समाज माध्यमावर या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल करणाºया समाजकंटकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्ह्यातील विविध संघटनांनी केली़ ठाणेदाराला निवेदन देऊन अशा घटनांचा निषेध करण्यात आला़

Immediately arrest those who burn constitution! | संविधान जाळणाऱ्यांना तातडीने अटक करा!

संविधान जाळणाऱ्यांना तातडीने अटक करा!

googlenewsNext
ठळक मुद्देविविध संघटनांची मागणी : ठाणेदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दिल्ली येथील जंतरमंतरवर संविधान जाळून समाज माध्यमावर या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल करणाºया समाजकंटकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्ह्यातील विविध संघटनांनी केली़ ठाणेदाराला निवेदन देऊन अशा घटनांचा निषेध करण्यात आला़
वरोरा : वरोरा येथील ठाणेदारांना विनोद खोब्रागडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले़ संविधानाचा अपमान करून समाज माध्यमामध्ये व्हिडिओ व्हायरल करणे हे देशद्रोही कृत्य आहे़ या घटनेमुळे देशातील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत़ त्यामुळे अशा समाजकंटकांवर ५०४,५०५ (१),५०५ (२), ३४ व अनुसूचित जाती -जमाती कायद्यातील कलम ३ (१)१० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचे नागरिकत्व रद्द करण्याची मागणी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली़
राजुरा : बीआरएसपीच्या वतीने राजुरा ठाणेदारांना निवेदन देण्यात आले़ यावेळी अनीश मानकर, साहिल झाडे, संघपाल देठे, राकेश माथनकर, प्रशांत वाघमारे, ओलविन सावरकर, आॅस्टीन सावरकर,आकाश नले, अशील ब्रामणे, श्रीकांत नले,चंदू नले, प्रदीप उपरे,सोनू घोडमोडे, नीलम उपरे, पूजा मावलीकर, जिजा नले, नंदिनी नले, लाता उपरे आदी उपस्थित होते.
माजरी : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाºयांविरूद्ध ठाणेदाराला निवेदन देण्यात आले़ लोकशाही देशात राहून महापुरूषांचा अपमान करणे चुकीचे असून आरोपींना कायद्यानुसार कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातून केली़ आहे़ यावेळी बीआरएसपीचे संदेश ढोके, हर्षानंद रामटेके, रितेश चिकाटे, शुभम कांबले, वैभव खिरटकर व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़

Web Title: Immediately arrest those who burn constitution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.