पथदर्शी योजनांची तत्काळ अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:42 AM2019-06-14T00:42:40+5:302019-06-14T00:44:06+5:30

केंद्र व राज्य शासनाच्या विविध पथदर्शी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्धारित काळामध्ये उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी गुरुवारी दिले. थेट मंत्रालयातून चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या विविध पथदर्शी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करत नसलेल्या अधिकाऱ्यांना समज दिली.

Immediately implement pilot schemes | पथदर्शी योजनांची तत्काळ अंमलबजावणी करा

पथदर्शी योजनांची तत्काळ अंमलबजावणी करा

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांशी केली चर्चा : विविध पथदर्शी योजनेचा मुख्य सचिवांकडून आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र व राज्य शासनाच्या विविध पथदर्शी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्धारित काळामध्ये उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी गुरुवारी दिले. थेट मंत्रालयातून चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या विविध पथदर्शी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करत नसलेल्या अधिकाऱ्यांना समज दिली.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व प्रधानमंत्री पीक विमा योजना यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्याचा आढावा गुरुवारी घेण्यात आला. मुख्य सचिव, संबंधित खात्याचे सचिव, जिल्हाधिकारी, राज्यातील संबंधित खात्याचे प्रमुख अधिकारी यांचा समावेश असणाºया चमूसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आज घेण्यात आली.
यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान, दुष्काळी परिस्थितीचा आढावा, दुष्काळ अनुदान वाटपाचा आढावा, पाणी टंचाई परिस्थितीचा आढावा, पीक कर्ज वाटप बाबतचा आढावा तसेच स्वच्छता अभियानाची सद्यस्थिती, राष्ट्रीय हरित न्यायालयाने दिलेल्या निदेर्शांचे अंमलबजावणी करणे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत विकास कामांचा आढावा, प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत अप्राप्त प्रस्तावांचा आढावा, अल्पसंख्यांकांच्या शैक्षणिक संस्थांच्या पायाभूत सुविधांसाठी अनुदान उपलब्धतेचा आढावा, डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत प्रस्ताव प्राप्त न झालेल्या जिल्ह्याचा आढावा, अशा विविध योजनांचा आढावा आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्याचे कौतुक
या बैठकीमध्ये ज्या जिल्ह्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व प्रधानमंत्री पिक विमा योजना या घटकामध्ये कमी कामे केली आहेत. त्या जिल्ह्यांना ३० जूनपर्यंत अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानामध्ये चांगली कामे केल्याने चंद्रपूर जिल्ह्याचे कौतुकदेखील करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्याचे वरील सर्व योजनेमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक काम केले असून जलयुक्त शिवार अभियानाला अधिक गती देण्याचे यावेळी निर्देश देण्यात आले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Immediately implement pilot schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार