चिमूरातील अस्वच्छता व दूषित पाण्याचे तातडीने नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:29 AM2021-07-28T04:29:49+5:302021-07-28T04:29:49+5:30
चिमूर : नगर परिषद क्षेत्रात पावसाळ्यात समस्या वाढत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. अनेक प्रभागात स्वच्छता व नाल्या ...
चिमूर : नगर परिषद क्षेत्रात पावसाळ्यात समस्या वाढत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. अनेक प्रभागात स्वच्छता व नाल्या उपसा होत नाही. नियमित उपसा व स्वच्छता करून फाॅगिंग मशीनने फवारणी करण्यात यावी. तरच डेंग्यू व इतर आजारावर नियंत्रण करता येईल. ले-आऊटमधील पाणी साचून राहत असल्याने पाईप उपलब्ध करून दिले जाईल, अशा सूचना आमदार बंटी भांगडीया यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. लोकप्रतिनिधी, न. प. अधिकारी व कर्मचारी यांच्या एकोप्यातून विकास साधता येतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
चिमूर नगर परिषदच्या आढावा सभेत ते बोलत होते. या सभेला वसंत वारजुकर, भाजप जिल्हा सचिव राजू देवतळे तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, उपविभागीय अधिकारी तथा न.प. प्रशासक संकपाळ, तहसीलदार संजय नागटिळक, बीडीओ साळवे, प्रभारी मुख्याधिकारी भोयर उपस्थित होते. यावेळी माजी सभापती सतीश जाधव, माजी नगरसेविका उषा हिवरकर, बंटी वनकर, विकी कोरेकर, अरुण लोहकरे, जयंत गौरकर, सुरज नरुले यांनी आपल्या प्रभागातील समस्यांकडे लक्ष वेधळे. त्यावर न. प्रशासन न.प.ने या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. या सभेला समीर राचलवार, सतीश जाधव, बंटी वनकर, प्रदीप कामडी सचिन फरकाडे, अशोक कामडी, उषा हिवरकर, हेमलता ननावरे, विवेक कापसे, प्रशांत चिडे, जयंत गौरकर, गोलू भरडकर, संजय कुंभारे, सुरज नरुले, सौरभ बडगे, अरुण लोहकरे, विकी कोरेकर आदी उपस्थित होते.
270721\1910-img-20210727-wa0030.jpg
लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या एकोप्यातून