चंद्रपुरात ८ हजार ६४ गणेशमूर्तींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:31 AM2021-09-21T04:31:27+5:302021-09-21T04:31:27+5:30
बॉक्स चंद्रपुरात ८०६४ गणेशमूर्तींचे विसर्जन चंद्रपुरात या वर्षी एकाही पीओपी मूर्तीची विक्री झाली नाही. घरगुती व सार्वजनिक मंडळांनी मनपाच्या ...
बॉक्स
चंद्रपुरात ८०६४ गणेशमूर्तींचे विसर्जन
चंद्रपुरात या वर्षी एकाही पीओपी मूर्तीची विक्री झाली नाही. घरगुती व सार्वजनिक मंडळांनी मनपाच्या कृत्रिम कुंडाचा लाभ घेत ८ हजार ६४ गणेशमूर्तींचे विसर्जन केले. ४३ गणेशभक्तांनी फिरत्या विसर्जन कुंडाचाही लाभ घेतला. २७ ठिकाणी विसर्जन कुंड व १९ निर्माल्य कलश ठेवले होते. पर्यावरणस्नेही गणेशोत्सव मोहिमेला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.
बॉक्स
पीओपीला यंदा भाविकांचा १०० टक्के नकार
शहरात गतवर्षी पीओपी मूर्तीची विक्री व खरेदी झाली होती. मनपाने तयार केलेल्या कृत्रिम तलावात ७ हजार ८१३ मूर्तींचे विसर्जन झाले. गतवर्षी पीओपीच्या १ हजार ४९ मूर्ती आढळल्या होत्या. यंदा मूर्तिकार व स्वयंसेवी संस्थांना विश्वासात घेऊन जनजागृती केल्याने एकही पीओपी मूर्ती आढळली नाही. तलाव व नदीच्या पात्रात विसर्जन न करता नागरिकांनी १०० टक्के पर्यावरणपूरक गणेशाेत्सव साजरा केला.
बॉक्स
विसर्जन कुंडातील माती मूर्तिकारांना परत
महापौर राखी कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून मनपाने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत घेतलेल्या पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. स्पर्धेत ४० जणांनी सहभाग घेतला. रामाळा तलाव व इरई नदी परिसरासह विविध चौकांत ठेवलेल्या कृत्रिम कुंडांचा लाभ घेतलेल्या १ हजार ८०० गणेशभक्तांना जास्वंदाचे रोप व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विसर्जन कुंडात जमा झालेली माती मूर्तिकारांना पुनर्वापरासाठी देण्यात आली.