चंद्रपुरात सोळाशे गणेशमूर्तींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:26 AM2021-09-13T04:26:39+5:302021-09-13T04:26:39+5:30

चंद्रपूर : गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत शहराच्या सर्व भागात १० दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी भक्तिमय वातावरणात ...

Immersion of sixteen hundred Ganesha idols in Chandrapur | चंद्रपुरात सोळाशे गणेशमूर्तींचे विसर्जन

चंद्रपुरात सोळाशे गणेशमूर्तींचे विसर्जन

Next

चंद्रपूर : गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत शहराच्या सर्व भागात १० दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी भक्तिमय वातावरणात आणि शांततेत बाप्पाचे आगमन झाले. शनिवारी सायंकाळपासून रविवारी सकाळपर्यंत दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी लावलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात सुमारे सोळाशे मूर्तींचे विसर्जन पार पडले.

शहरात ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड व निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. झोन क्रमांक १ मध्ये मनपा झोन कार्यालय, संजय गांधी मार्केट नागपूर रोड, डॉ. बाबा आमटे अभ्यासिका, दाताळा रोड, इरई नदी, तुकुम प्रा. शाळा (मनपा, चंद्रपूर), झोन क्रमांक २ मध्ये गांधी चौक, लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा पठाणपुरा रोड, समाधी वार्ड, शिवाजी चौक, अंचलेश्वर रोड, विठोबा खिडकी, विठ्ठल मंदिर वार्ड, रामाळा तलाव, हनुमान खिडकी, महाकाली प्रा. शाळा, महाकाली वॉर्ड, झोन क्रमांक ३ मध्ये नटराज टाॅकीज (ताडोबा रोड), सावित्रीबाई फुले प्रा. शाळा बाबुपेठ, मनपा झोन कार्यालय, मूल रोड, बंगाली कॅम्प चौक आदी ठिकाणी कृत्रिम विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. ११ सप्टेंबर रोजी रात्रीपर्यंत ८७ मूर्तींचे विसर्जन झाले, तर १२ सप्टेंबर रोजी एकूण १ हजार ५१९ मूर्ती विसर्जित झाल्या. पहिल्या दीड दिवसांच्या एकूण १६०६ मूर्ती विसर्जित झाल्या. शहरात झोननिहाय फिरते विसर्जन कुंड व्यवस्था करण्यात आली असून, सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत उपलब्ध राहणार आहे.

बाॅक्स

येथे करा संपर्क

झोन १ - ९८८१५९०४०२

झोन २ - ९६६५४०३९९४

झोन ३ - ९६०७८४८६४८

Web Title: Immersion of sixteen hundred Ganesha idols in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.