विकासाच्या नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:47 PM2018-09-01T23:47:13+5:302018-09-01T23:47:51+5:30

राज्यातील आदिवासींचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. त्यामुळे या ठिकाणी नाविन्यपूर्ण अनुसूचित जमातीच्या योजनांची अंमलबजावणी अपेक्षित आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी अधिक सक्षमतेने प्रयत्न करावे, असे निर्देश अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार अशोक उईके यांनी केले.

Implement innovative schemes for development | विकासाच्या नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करा

विकासाच्या नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करा

Next
ठळक मुद्देअशोक उईके : नियोजन भवनात विकास कामांची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यातील आदिवासींचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. त्यामुळे या ठिकाणी नाविन्यपूर्ण अनुसूचित जमातीच्या योजनांची अंमलबजावणी अपेक्षित आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी अधिक सक्षमतेने प्रयत्न करावे, असे निर्देश अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार अशोक उईके यांनी केले.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या दौरा कार्यक्रमाचा शनिवारी दुपारी समारोप झाला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शेवटच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे होत आहे. आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमाचा हातभार लावा, असे आवाहनही समिती अध्यक्ष आमदार उईके यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला केले. ही समिती अनुसूचित जमाती संदर्भातीला कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आली होती.
अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार अशोक उईके यांच्या नेतृत्वात १५ आमदारांची ही समिती आहे.
त्यापैकी १२ आमदार या दौऱ्यात उपस्थित होते. यामध्ये आमदार वैभव पिचड, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार पंकज भोयर, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार शांताराम मोरे, आमदार पांडुरंग बरोरा, आमदार आनंद ठाकूर, आमदार पास्कल धनारे, आमदार संतोष टारफे, आमदार संजय पुराम आदींचा समावेश होता.
अधिकाऱ्यांमुळे मुंबईच्या विभाग सचिवांना द्यावी लागणार उत्तरे
तीन दिवसांत या समितीने सर्व संबंधित विभागाचा आढावा घेतला. यामध्ये अनेक विभागात अनियमितता आढळली. दरम्यान, अनेक अधिकाºयांची झाडाझडतीही घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, प्रदूषण नियंत्रण मंडळ, टुरिझम मंडळ, मस्त्य व्यवसाय विकास अधिकारी, खनिकर्म विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या काही विभाग प्रमुख समाधानकारक उत्तरे सादर करू शकले नाही. त्यांच्या अहवालात गंभीर प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या. यावर समितीने नाराजी व्यक्त केली. आता ही समिती सदर अधिकाऱ्यांच्या विभागाचा आढावा त्यांच्या मंत्रालयातील विभाग सचिवांमार्फत घेणार असल्याची माहिती सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
विकासकामांबाबत ना.मुनगंटीवारांचे कौतुक
अनुसूचित जमाती कल्याण समितीने मागील तीन दिवसांत अनेक विभागांचा आढावा घेतला. तसेच अनेक भागांना भेटी दिल्या असता त्यांना चंद्रपूर जिल्ह्यात राज्याचे अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पुढाकारात झपाट्याने विकास सुरू असल्याचे निदर्शनास आले. शनिवारी शेवटच्या दिवसी समितीने या विकासकामांबाबत ना. सुधीर मुनगंटीवार यांचे कौतुक केले.

Web Title: Implement innovative schemes for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.