शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:24 PM2018-09-18T22:24:07+5:302018-09-18T22:24:27+5:30

जिल्ह्यामधील सर्व घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्रामध्ये शिष्यवृत्ती अभावी कोणतीही अडचण येणार नाही. या संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत करावयाच्या उपाय योजनाबाबत सर्व शैक्षणिक संस्थांनी काटकोरपणे अमंलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारी दिले.

Implement the scholarship scheme | शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी करा

शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी करा

Next
ठळक मुद्देकुणाल खेमनार : जिल्हास्तरीय बैठकीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यामधील सर्व घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्रामध्ये शिष्यवृत्ती अभावी कोणतीही अडचण येणार नाही. या संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत करावयाच्या उपाय योजनाबाबत सर्व शैक्षणिक संस्थांनी काटकोरपणे अमंलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारी दिले.
जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना अमंलबजावणीची जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली. यामध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. नेहे सचिव तर सदस्य म्हणून सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश इंगोले, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक अविनाश टेकाडे, सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक व्ही. जी. नागदेवते, राष्ट्रपिता महात्मा गांधी विज्ञान व कला महाविद्यालय नागभीडचे प्राचार्य अनिल कोसेवार, जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष, शासकीय तंत्रनिकेत ब्रह्मपूरीचे प्राचार्य डॉ. मनोज गायगव्हाने, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक व्ही. बी. वैद्य, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक संचालक भैयासाहेब येरमे आदींची उपस्थिती होती. या नव्या योजनेच्या अमंलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी तसेच यातील तांत्रिक व अतांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या संदर्भात नेमकी शिष्यवृत्ती किती मुलांना लागू होईल, या संदर्भात जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांनी आकडेवारी सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले. याशिवाय डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना याबद्दलही आढावा घेण्यात आला.

Web Title: Implement the scholarship scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.