स्थायी समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 11:01 PM2018-07-04T23:01:20+5:302018-07-04T23:02:25+5:30

महानगर पालिकेच्या स्थायी समितीची सभा मनपा सभागृहात पार पडली. या सभेत सभागृहाच्या अजेंड्यावरील विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. स्थायी समितीच्या सभेत चर्चेला आलेल्या सर्व निर्णयांची अधिकाऱ्यांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांनी यावेळी दिले.

Implement Standing Committee's decisions | स्थायी समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करा

स्थायी समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करा

Next
ठळक मुद्देराहुल पावडे यांचे निर्देश : मनपात पार पडली सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानगर पालिकेच्या स्थायी समितीची सभा मनपा सभागृहात पार पडली. या सभेत सभागृहाच्या अजेंड्यावरील विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. स्थायी समितीच्या सभेत चर्चेला आलेल्या सर्व निर्णयांची अधिकाऱ्यांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांनी यावेळी दिले.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, स्थायी समितीचे सर्व सदस्य व मनपा अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी पंडीत दिनदयाळ अंत्योदय योजना नागरी उपजिवीका अभियानाचा साप्ताहिक तपासणी अहवाल सदस्यांसमोर सादर करण्यात आला. सभेत पंतप्रधान आवास योजनेचाही आढावा घ्ेण्यात आला. पंतप्रधान आवास योजनेची कार्यवाही विहीत मुदतीत पुर्ण करण्याच्या व योजनेस गती देण्याच्या दृष्टीने पट्टे वाटपाची गती वाढविणे आवश्यक आहे. सद्यास्थितीत किती झोपडपट्यांचे सर्वेक्षण झाले व किती शिल्लक आहे, या कामाचा अहवाल सादर करण्याच्या नगररचना विभागाला सभापतींनी सूचना केल्या.
प्रधानमंत्री आवास योजना ही समाजातील दुर्बल घटकांसाठी असून अटी व शर्तीच्या निकषानुसार यापासून कोणीही वंचित राहु नये, यासाठी संबंधित विभागाने तसेच प्रशासनाने कामाची गती वाढवावी. सर्वे करताना सदस्यांना विश्वासात घेऊन सर्वे करावा आणि झोपडपट्ट्यांची यादी सर्व सदस्यांना पुरविण्यात यावी. तसेच संबंधित एजन्सीने झोपडपट्टीचे सर्वेक्षण कार्य विहीत मुदतीत पूर्ण न केल्यास किंवा योजनेच्या कार्यात दिरंगाई केल्यास संंबंधित एजन्सीवर कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश सभापती राहुल पावडे यांनी दिले.
घरकूल व शौचालय योजनेच्या संदर्भात अनेक तक्रारी आल्या असून दोन्ही योजनांपासून लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी संबंधित विभागाने अत्यंत काटेकोरपणे कार्य करावे. शौचालय योजनेसंदर्भात काही लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्याचे देयके धनादेशाच्या स्वरूपात मिळाले आहेत तर काहींना नाही, अशी तफावत दिसून येत आहे. तशीच घरकूल योजनेच्या देयकाच्या संदर्भातील तफावती सोडविण्यात याव्यात, अशा समस्या निकाली काढण्याकरिता झोननिहाय एक दिवस ठरवून नागरिकांच्या तक्रारी प्राप्त करून घ्यावा व प्राप्त झालेल्या तक्रारीवर झोननिहाय मोहीम राबवून उपाययोजना करून त्या निकाली काढण्यात याव्यात. यासाठी संबधित अधिकारी, स्वच्छता कर्मचारी व संबंधित विभागास जबाबदारी दिली असेल, त्यांनी माहिती संकलित करून अहवाल सादर करण्याच्या सूचना सभापतींनी केल्या.
नगरोत्थान निधीच्या कामांचाही आढावा
या सभेत महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान कामाचा आढावा घेण्यात आला. चंद्रपूर शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, भविष्यात शहरामध्ये पाणी टंचाईचे संकट निर्माण होवू नये, यासाठी शहरात महत्त्वाकांक्षी अमृत योजना राबविण्यात येत आहे. या योजनाची कार्यवाही सुरू असताना व पाईपलाईन टाकण्याकरिता सद्यास्थितीत शहरातील काही रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले. त्या रस्त्यांची लवकरात लवकर दुरूस्ती करून शहराच्या सौंदर्यीकरणात सुधारणा करावी, यासाठी नगरोत्थान महाअभियान निधीच्या ई-टेंडरींग कामास मंजुरी देवून कामे तत्काळ सुरू करण्यात यावे, असे निर्देश दिले.

Web Title: Implement Standing Committee's decisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.