बंदीतही सुगंधित तंबाखूची आयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:00 AM2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:00:25+5:30

जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र दारू आता गल्लीबोळात मिळते. पोलीस किरकोळ दारूविक्रेत्यांना पकडतात. सोबतच त्यांच्या हाती अनेकदा लाखो रूपयांचा दारूसाठा सुद्धा लागतो. मात्र बंदी असलेला तंबाखू याबाबतीत अपवाद ठरला आहे. केवळ कारवाईचे सोपस्कार पार पाडले जातात. शहरातील पान टपऱ्यांना लक्ष केले जाते. परंतु सुगंधित तंबाखू येतो कुठून, याचा शोध पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन अद्याप घेऊ शकले नाही.

Imports of fragrant tobacco in ban | बंदीतही सुगंधित तंबाखूची आयात

बंदीतही सुगंधित तंबाखूची आयात

Next
ठळक मुद्देपानटपऱ्यांवर कारवाई : तंबाखूचे मोठे तस्कर मात्र मोकाट

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यात सुगंधित तंबाखूवर बंदी आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडका लावला आहे. शहरातील पानटपºयावरील खर्राला त्यांनी लक्ष केले आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात सुगंधित तंबाखू येतो कुठून, याचा शोध घेण्याची तसदी अद्याप त्यांनी घेतली नाही. पोलीस प्रशासनाच्या हातीसुद्धा अपवाद वगळता आजवर तंबाखूचा मोठा साठा मिळालेला नाही.
जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र दारू आता गल्लीबोळात मिळते. पोलीस किरकोळ दारूविक्रेत्यांना पकडतात. सोबतच त्यांच्या हाती अनेकदा लाखो रूपयांचा दारूसाठा सुद्धा लागतो. मात्र बंदी असलेला तंबाखू याबाबतीत अपवाद ठरला आहे. केवळ कारवाईचे सोपस्कार पार पाडले जातात. शहरातील पान टपऱ्यांना लक्ष केले जाते. परंतु सुगंधित तंबाखू येतो कुठून, याचा शोध पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन अद्याप घेऊ शकले नाही. सुत्रानुसार मध्यप्रदेशातील रायपूर, दुर्ग आणि भिल्लई येथून तंबाखूची तस्करी केली जाते.
मध्यप्रदेशाच्या सीमेला लागून असलेल्या भागात हा तंबाखू आणला जातो. विशेषत: गडचिरोली यासाठी सुरक्षित समजला जातो. जिथून घाऊक विक्रेत्यांना आणि त्यानंतर किरकोळ विक्रेत्यांपर्यंत तो पोहचविला जातो. चंद्रपुरात आणि बल्लारपुरातील तस्कर या घाऊक विक्रेत्यांची भूमिका बजावत असल्याची माहिती आहे. रायपूर ते गडचिरोली, गडचिरोली ते चंद्रपूरपर्यंत सुगंधित तंबाखू सुखरूप आणण्यासाठी लाखो रूपये महिन्याकाठी संबंधितांना दिले जातात. त्यामुळे आजवर या व्यापाºयांवर कारवाई झाली नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
बंदी असताना जिल्हाभरात हजारो पानटपरीवर खुल्लेआम सुगंधित तंबाखू व त्यापासून तयार होणारे खर्रे मिळत आहे.

तस्करीची साखळी शोधण्याची गरज
पानटपºया आता रोजगाराचे माध्यम झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली की स्थानिक लोकप्रतिनिधी अडवणूक करतात. या नेत्यांचाही पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाला एकच प्रश्न असतो की तंबाखू येतो कुठून, याचे उत्तर मात्र ते देवू शकत नाही. ज्यांच्या पानटपरीवर तंबाखू जप्त केला जातो. त्यांच्याकडून याची माहिती पोलिसांना मिळू शकते. ही साखळी शोधून काढता येते. परंतु पानटपरी चालकांकडून तंबाखू जप्त करण्यापलिकडे या अधिकाºयांची कारवाई पुढे जात नाही. असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे मोठे तस्कर अद्यापही पोलिसांच्या आणि अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईपासून दूर आहे. चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणाहूनच सुगंधित तंबाखूचे किरकोळ विके्रत्यांना खुलेआम वितरण केले जाते. याची माहिती पोलिसांनाही आहे. परंतु ते ही याकडे डोळेझाक करतात, असे सुत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे पानटपरीवरील कारवाईच्या निमित्ताने फाद्यां छाटण्याचे नाटक केले जाते. परंतु मुळावर घाव घालण्यात अर्थकारण आडवे येते अशी चर्चा आहे.
 

Web Title: Imports of fragrant tobacco in ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.