दुधाच्या निर्धारणात ८ ते ८.२ टक्के अशी सुधारणा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 11:11 PM2018-07-30T23:11:33+5:302018-07-30T23:12:17+5:30
अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाद्वारे दूधाचे एसएनएफ मानांकन ८.५ टक्के निर्धारित असले तरी चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या दुग्धोत्पादनाच्या अनुषंगाने या एसएनएफ निर्धारणात सुधारणा करून ते ८ किंवा ८.२ टक्के करण्यात यावे. जेणेकरून जिल्ह्यातील दुग्धोत्पादनाला प्रोत्साहन मिळून दुग्धव्यवसायींना, शेतकऱ्यांना तसेच जिल्हा मदर डेअरीधारकांना योग्य न्याय मिळेल व ग्राहकांची दूधाची मागणी जिल्हा स्तरावरून पूर्ण केली जाईल.
Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : डेअरी विकास बोर्ड व अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाला प्रस्ताव पाठवा
<p>लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाद्वारे दूधाचे एसएनएफ मानांकन ८.५ टक्के निर्धारित असले तरी चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या दुग्धोत्पादनाच्या अनुषंगाने या एसएनएफ निर्धारणात सुधारणा करून ते ८ किंवा ८.२ टक्के करण्यात यावे. जेणेकरून जिल्ह्यातील दुग्धोत्पादनाला प्रोत्साहन मिळून दुग्धव्यवसायींना, शेतकऱ्यांना तसेच जिल्हा मदर डेअरीधारकांना योग्य न्याय मिळेल व ग्राहकांची दूधाची मागणी जिल्हा स्तरावरून पूर्ण केली जाईल. संबंधित अधिकाऱ्यांनी या पार्श्र्वभूमीवर या आशयाचा प्रस्ताव राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाकडे सादर करावा, असे निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मदर डेअरी समन्वय सभेत मार्गदर्शन करतांना दिले.
स्थानिय शासकीय विश्रामगृहात ना. हंसराज अहीर यांनी बोलाविलेल्या या समन्वय सभेला मदर डेअरीचे जिल्हा प्रमुख पांडे, चंद्रपूर देवाडा येथील दूध संकलक प्रफुल पिदुरकर, जिल्हा दुग्धविकास व्यवसाय अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व अन्य दूध संकलकाची उपस्थिती होती. मदर डेअरीद्वारा स्थापित युनिटमुळे जिल्ह्यामध्ये दुग्धोत्पादनास प्रोत्साहन मिळाले असून अनेक पशुपालकांनी बँकांचे कर्ज घेवून दुधाळू जनावरे खरेदी केली आहेत. दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबास हातभार लावण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र मानांकनाचा मुद्दा पुढे करीत ८.५ एसएनएफची सक्ती होत आहे. जिल्हयात यापेक्षा कमी एसएनएफ ८ व ८.२ टक्के असलेले पशुपालकांद्वारा पुरवठा होत असलेले दूध मदर डेअरी द्वारा स्वीकारण्यात येत नसल्याची बाब पुढे आली आहे. यामुळे जिल्ह्यात दुग्ध व्यवसायावर अरिष्ट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. यात दुग्ध व्यवसायींचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारींची मदर डेअरी तसेच शासकीय दुग्ध विकास अधिकाºयांनी गांभीर्याने दखल घ्यावी, असे निर्देशही ना. अहीर यांनी दिले. स्थापित मानांकनाचा आग्रह न धरता एसएनएफ ८ टक्के ८.१ टक्के व ८.२ टक्के असलेले दूध स्वीकारण्यात यावे, याकडेही ना. अहीर यांनी लक्ष वेधले. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाद्वारे स्थापित एसएनएफ मानांकनात सुधार करून ८.५ ऐवजी ८.२ टक्क्यांपर्यंत एसएनएफ असलेल्या दुधाच्या खरेदीस मान्यता देण्यात यावी या आशयाचा प्रस्ताव राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या माध्यमातून संबंधित मानांकन निधार्रीत करणाऱ्या यंत्राणेकडे सादर करण्यात यावा, असेही केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. अहीर यांनी यावेळी निर्देशित केले. बैठकीला सुमारे ३० हून अधिक दुग्धोत्पादक उपस्थित होते. दरम्यान केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी मदर डेअरी संचालक तसेच राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या चेअरमन यांना उपरोक्त विषयानुषंगाने पत्र लिहीले.