'कृउबा'च्या निवडणुकीत १ हजार १८५ अवैध मते; नऊ बाजार समितीतील स्थिती, वरोरा आघाडीवर
By साईनाथ कुचनकार | Published: April 30, 2023 05:21 PM2023-04-30T17:21:10+5:302023-04-30T17:21:27+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील बारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घोषित करण्यात आली.
चंद्रपूर : जिल्ह्यातील बारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घोषित करण्यात आली. यातील नऊ बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान झाले आणि शनिवारी निकाल लागला. तीन बाजार समितीसाठी रविवारी मतदान तसेच निकाल घोषित करण्यात येणार आहे. दरम्यान, नऊ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण मतदारांपैकी तब्बल १ हजार १८५ मतदारांनी अवैध मतदान केल्याचे पुढे आले आहे. यामध्ये वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अवैध मतदानामध्ये आघाडीवर आहे.
जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, चंद्रपूर, वरोरा, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल या बाजार समितीची निवडणूक पार पाडली. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये काही दिग्गजांना पराभव पत्करावा लागला तर काहींचा अनपेक्षित विजय सुद्धा झाला; मात्र निवडणुकीमध्ये तब्बल १ हजार १८५ जणांनी अवैध मतदान केल्याचे आता पुढे आले आहे.
अशी आहे अवैध मतसंख्या
- सेवा सहकारी संस्था मतदारसंघ (सर्वसाधारण) -२१६
- सेवा सहकारी संस्था मतदारसंघ (महिला राखीव) ८६
- सेवा सहकारी संस्था मतदारसंघ (इमाव)-८३
- सेवा सहकारी संस्था मतदारसंघ (भजाविज)-११७
- ग्रामपंचायत मतदारसंघ (सर्वसाधारण )-२०१
- ग्रामपंचायत मतदारसंघ (अनुसूचित जाती, जमाती)-२४५
- ग्रामपंचायत मतदारसंघ (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) -२०९
- व्यापारी व अडते मतदार संघ ११
- हमाल व मापाडी मतदार संघ १७
- मूल-१००
- सिंदेवाही -६७
- ब्रह्मपुरी -१४९
- कोरपना -१५१
- राजुरा -६४
- नागभीड -६९
- चिमूर -१४७
- वरोरा -३२९
- एकूण-११८५