जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने उद्योग समूहात रक्तदान शिबिराचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:32 AM2021-09-12T04:32:02+5:302021-09-12T04:32:02+5:30
चंद्रपूर : कोरोनामुळे रक्तपेढीतील रक्तसाठ्यामध्ये कमतरता भासत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील सर्व उद्योग समूहाची ...
चंद्रपूर : कोरोनामुळे रक्तपेढीतील रक्तसाठ्यामध्ये कमतरता भासत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील सर्व उद्योग समूहाची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सभा घेत रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वप्रथम धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या उद्योग समूहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात १२० जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून धारीवाल इन्फास्ट्रक्चरचे भास्कर गांगुली, व्यवस्थापक सौमीन बानिया, अतुल गोयल, दिनेश गाखर, संदीप मुखर्जी आदींची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले की, एक व्यक्ती वर्षातून तीन ते चारदा रक्तदान करू शकते. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याचे त्यांनी सांगितले. शिबिरात १२० जणांनी रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. अनंत हजारे यांच्या मार्गदर्शनातंर्गत रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश खिचडे, समाजसेवा अधिकारी संजय गावित, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमोल जिद्देवार, जयवंत पचारे, रोशन भोयर, योगेश जारोंडे, चेतन वैरागडे, साहील, अभिजित आदींनी प्रयत्न केले.