हायटेक फार्मसी महाविद्यालयात दीक्षात समारोह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:38 AM2021-02-27T04:38:03+5:302021-02-27T04:38:03+5:30
चंद्रपूर : स्थानिक हायटेक कॉलेज ऑफ फार्मसी येथे कोरोना नियमांचे पालन करीत महाविद्यालयस्तरीय दीक्षांत समारोह नुकताच पार पडला. कार्यक्रमाची ...
चंद्रपूर : स्थानिक हायटेक कॉलेज ऑफ फार्मसी येथे कोरोना नियमांचे पालन करीत महाविद्यालयस्तरीय दीक्षांत समारोह नुकताच पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात गोंडवाना गीताने करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विजय वाढई, संस्थाध्यक्ष प्रशांत मोरे, प्राचार्य सतिश कोसलगे उपस्थित होते. यावेळी डॉ. विजय वाढई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी गोंडवाना विद्यापीठातील प्रथम कोमल दासरवार, द्वितीय आकांक्षा अवताडे, तृतीय नमिरा अहमद यांना अतिथीच्या हस्ते प्रावीण्य व पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुचिता वाघमारे तर आभार वसीम शेख यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. सतिश कोसलगे व उपप्राचार्य सुशिल बुरले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यशस्वीतेसाठी पंकज पिंपळशेंडे, प्रा. पराग चवरे, प्रा. निखिल लोहे आदींने परिश्रम घेतले.