चंद्रपुरात डायलेसिस केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:32 AM2021-09-06T04:32:07+5:302021-09-06T04:32:07+5:30
या डायलेसिस केंद्रांचा लाभ गरजू व्यक्तींना होणार आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पाला चड्डा यांनी मदत केली. अशीच मदत तथा सहकार्य ...
या डायलेसिस केंद्रांचा लाभ गरजू व्यक्तींना होणार आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पाला चड्डा यांनी मदत केली. अशीच मदत तथा सहकार्य चंद्रपूर जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी करावे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी महोदय यांनी यावेळी व्यक्त केली. किशनलाल चड्डा यांनी भविष्यात अशा लोकोपयोगी प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्टचे अध्यक्ष राजेंद्र कंचर्लावार यांनी तर आभार प्रदर्शन वीरेंद्र हजारे यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन ॲड. जयंत साळवे यांनी केले.
कोरोनाचा काळ असल्यामुळे कोरोना नियमावलीचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत डॉ. सतीश तातावार यांनी केले.
या कार्यक्रमास चड्डा परिवारातील सदस्य रोशनलाल चड्डा, अनुज चड्डा, मनीष चड्डा, मोहित चड्डा व राहुल चड्डा तसेच पंजाबी सेवा समितीचे सदस्य व रोटरी क्लब ऑफ चांदाफोर्टच्या सदस्यांनी हजेरी लावली.
सदर डायलेसिस प्रकल्प चालविण्याकरिता एक समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये राजेंद्र कंचर्लावार, मनीष चड्डा, डॉ. सतीश तातावार, हेमंत कुलकर्णी, वीरेंद्र हजारे, पीयूष मामीडवार, रोटे. दीपक चौधरी तथा ॲड. जयंत साळवे यांचा समावेश असणार आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणाऱ्या या चांगल्या प्रकल्पाचा लाभ गरजूंनी घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
050921\1616-img-20210905-wa0035.jpg
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मंचावर मान्यवर