पहिल्या डिजिटल शाळेचे उद्घाटन

By Admin | Published: February 15, 2017 12:39 AM2017-02-15T00:39:04+5:302017-02-15T00:39:04+5:30

शासनाच्या प्रगत जलद शैक्षणिक धोरणांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचा शिक्षण विभागाने संकल्प केला आहे.

Inauguration of the first digital school | पहिल्या डिजिटल शाळेचे उद्घाटन

पहिल्या डिजिटल शाळेचे उद्घाटन

googlenewsNext

नागभीड तालुका : कोसंबी गटाळी शाळेला मान
नागभीड : शासनाच्या प्रगत जलद शैक्षणिक धोरणांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचा शिक्षण विभागाने संकल्प केला आहे. या संकल्पाचा एक भाग म्हणून नागभीड तालुक्यातील पहिली डिजिटल होण्याचा मान कोसंबी गटाळी येथील शाळेने मिळवला असून याचे औपचारिक उद्घाटन मंगळवारी पार पडले.
संवर्ग विकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांनी या डिजिटल शाळेचे उद्घाटन केले. गटशिक्षणाधिकारी अशोक खोपडे, भागशिक्षणाधिकारी उपलंचीवार, नागो भानारकर, केंद्रप्रमुख प्रमोद नान्हे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगदीश कराडकर यांची यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी सहायक शिक्षक देवानंद तुळकाने यांनी तयार केलेला शाळेवरील शैक्षणिक व्ही.डी.ओ. विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. शाळेचे नुकतेच ३५ हजार रुपयाचा लोकसहभाग गोळा केला होता. या लोकसहभागाचे योग्य नियोजन करण्यात आले.
कोसंबी गवळी शाळेने डिजिटल शाळा निर्माण करण्यात घेतलेल्या आघाडीने संवर्ग विकास अधिकारी प्रकाश तोडेवार व गटशिक्षणाधिकारी अशोक खोपडे यांनी कौतूक केले. यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रात्यक्षिकही करून दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ममता पिलारे यांनी केले. संचालन देवानंद तुळकाने यांनी तर आभार सोमेश्वर खरकाटे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Inauguration of the first digital school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.