ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक आकापूर येथील घटना
By admin | Published: May 11, 2014 12:09 AM2014-05-11T00:09:53+5:302014-05-11T00:09:53+5:30
गडचिरोलीवरुन चंद्रपूरकडे जाणार्या भरधाव टॅÑव्हल्सची ट्रकला धडक बसली. या अपघातात ट्रॅव्हर्समधील १२ जण गंभीर जखमी झाले.
ट्रॅव्हल्समधील १२ प्रवासी जखमी
मूल : गडचिरोलीवरुन चंद्रपूरकडे जाणार्या भरधाव टॅÑव्हल्सची ट्रकला धडक बसली. या अपघातात ट्रॅव्हर्समधील १२ जण गंभीर जखमी झाले. सदर घटना मूलपासून चार किमी अंतरावरील आकापूर येथे शनिवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली. सध्या लग्नसराई असल्यामुळे ट्रॅव्हल्स व चारचाकी वाहनाने अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या वाहनधारकाचे चांगलेच फावत आहे. गडचिरोलीवरुन चंद्रपूरकडे जाणार्या दुर्गा ट्रॅव्हल्सने (एम.एच. ३४ ए- ८३३३) मूलजवळील आकापूर वळणमार्गावर सावलीवरुन राजोलीकडे जाणार्या ट्रकला (एम.एच. ३४ एबी- ५५४६ ) धडक दिल्याने ट्रॅव्हल्स मधील १२ जण गंभीर जखमी झालेले आहेत. सदर घटनेची माहिती मूल पोलिसांना मिळताच सहायक फौजदार श्रीराम कुमरे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ट्रकचालक शिवबरण सब्दीन निशाद (५५) रा. विवेकानंद वार्ड चंद्रपूर यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली आहे. निष्काळजीपणे व भरधाव वेगाने ट्रॅव्हल्स चालविल्यामुळे ट्रॅव्हल्सचालक स्वप्नील रमेश आप्रेटवार रा. जुनोना चौक चंद्रपूर हा गंभीर जखमी आहे तर चालक शिवबरण सब्दीन निशाद (५५) रा. विवेकानंद वार्ड चंद्रपूर, प्रकाश संदोकार (३५) रा. मोखाळा, भिका लाबाडे (३८) रा. रामाळा, विठ्ठल चिमूलवार (५२) रा. हिरापूर, खुशाल मादेशवार (३४) रा. रुद्रापूर, सुवर्णा मादेशवार (३०) रा. रुद्रापूर, मीनाक्षी शेंडे (१८) रा. पवना, रत्नमाला कावळे (२२) रा. गुंजेवाही, यशोदाबाई मोहुर्ले (५०) रा. बल्लारशहा, रजोत नागुलवार (१८) रा. आकापूर, मंगेश शेंडे (२४) रा. दिघोरी हे जखमी झाले असून त्यांच्यावर मूल व चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे. ट्रकचालकाच्या फिर्यादीवरुन ट्रॅव्हल्स चालक स्वप्नील रमेश आपेटीवार याच्यावर मूल पोलिसांनी कलम २७९, ३३७, ४२७ व मोटारवाहन कायदा १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नव्या ठाणेदारामुळे मूल शहरातून होणारी अवैध वाहतूक बंद होईल अशी अपेक्षा नागरिकांची होती. मात्र नागरिकांच्या अपेक्षेवर विरजन पडले. अवैध वाहतुकीमुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत असून अवैध वाहतूक बंद करावी, अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे. (तालुका प्रतिनिधी)