सिंदेवाही तालुक्यातील सहा गावांना बफर झोनमध्ये समाविष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:27 AM2021-08-29T04:27:19+5:302021-08-29T04:27:19+5:30
तालुका शिवसेनेचे उपसंचालकांना निवेदन सिंदेवाही : गडबोरी, वाकल, वानेरी, रामाळा आणि टेकरी ही गावे बफर झोनच्या ...
तालुका शिवसेनेचे उपसंचालकांना निवेदन
सिंदेवाही : गडबोरी, वाकल, वानेरी, रामाळा आणि टेकरी ही गावे बफर झोनच्या जंगलाला लागून आहेत. या गावांच्या शेजारील गावेही बफर झोनमध्ये मोडतात आणि जंगल लागून असल्यामुळे या गावांमधील शेतामध्ये वाघ, बिबट, अस्वल असे प्राणी ठिय्या मांडून असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्याच शेतावर जायला आता भीती वाटते. आजपर्यंत अनेक नागरिकांवर, पाळीव जनावरांवर त्यांच्या शेतात असो की गावात असो अनेक हल्ले झाले.
या गावांचा समावेश बफर झोनमध्ये नसल्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ या गावांमधील शेतकऱ्यांना मिळत नाही. या गावातसुद्धा हिंस्त्र प्राणी नेहमी येतात, हल्ले करतात, पण शासनाच्या ज्या योजना आहेत त्या मात्र बफरमध्ये जास्त मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे या गावांचा समावेश बफर झोनमध्ये करावा, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे. परंतु याकडे लक्ष देण्यात आले नाही. शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र मंडलवार यांनी शिवणी बफर झोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुपे यांच्यामार्फत उपसंचालक बफर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांना या संदर्भात निवेदन दिले. यावेळी क्षेत्र सहायक चिकाटे, तुमराम उपस्थित होते.