म्युकोरमायकॉसिस आजाराचा उपचार जनआरोग्य योजनेत समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:28 AM2021-05-09T04:28:55+5:302021-05-09T04:28:55+5:30

राज्यपाल, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांना पाठविलेल्या पत्रात आ. मुनगंटीवार यांनी म्हणाले, रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे कोविड रुग्णांमध्ये ...

Include treatment of mycorrhizal disease in public health plan | म्युकोरमायकॉसिस आजाराचा उपचार जनआरोग्य योजनेत समावेश करा

म्युकोरमायकॉसिस आजाराचा उपचार जनआरोग्य योजनेत समावेश करा

Next

राज्यपाल, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांना पाठविलेल्या पत्रात आ. मुनगंटीवार यांनी म्हणाले, रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे कोविड रुग्णांमध्ये हा संसर्ग आढळत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत म्युकोरमायकॉसिस बुरशीजन्य आजाराचे रुग्ण वाढले. याचा मृत्यूदर हा ५४ टक्के आहे. वेळेवर उपचार घेतले तरच आजारातून बाहेर पडता येते. नाकावाटे ही बुरशी डोळे आणि मेंदूकडे वाढत जाते. कोरोना उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या स्टेरॉईडमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. सामान्यत: श्वास घेताना युब्युक्युटस नावाचे जिवाणू नाकात जातात. परंतु रोगप्रतिकारशक्ती संतुलित नसेल तर म्युकोरमायकॉसिस बुरशीची वाढ होते. मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची वाढ होत आहे. सर्वसामान्य गरीब रुग्णाला उपचाराचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे

उपचाराचा खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रातून केली आहे.

Web Title: Include treatment of mycorrhizal disease in public health plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.