मनपातील ‘त्या’ ३३ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य !

By राजेश मडावी | Published: August 9, 2023 04:31 PM2023-08-09T16:31:17+5:302023-08-09T16:32:43+5:30

आरोग्य विभागात समावेशन 

Inclusion in the health department, smiles on the faces of 33 contract employees of chandrapur municipal corp. | मनपातील ‘त्या’ ३३ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य !

मनपातील ‘त्या’ ३३ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य !

googlenewsNext

चंद्रपूर : महानगर पालिका आरोग्य विभागातील ३३ कर्मचाऱ्यांना नोकरीत समावेशन केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. हा प्रश्न काही महिन्यांपासून रखडला होता. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा केल्याने समस्या दूर झाली. आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर अधिसंख्य पदे निर्माण करून ४ वैद्यकीय अधिकारी व ३३ कर्मचाऱ्यांच्या समावेशनाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहायक जिल्हाधिकारी मरुगानंथम एम., महापालिका आयुक्त विपीन पालिवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. नयना उत्तरवार व अधिकारी उपस्थित होते. चंद्रपूर पालिकेतील आरोग्य विभागात प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम फेज -२ अंतर्गत २००६-०७ पासून ३७ कर्मचारी (४ वैद्यकीय अधिकारी व ३३ कर्मचारी) मानधन तत्वावर आरोग्य सेवा देत आहेत.

मनपा आरोग्य विभाग मुख्यालय तसेच शहरातील ७ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात, १५ वर्षांपासून कर्मचारी कार्यरत आहेत. इतर महानगर पालिकेत प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम फेज -२ मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनपा सेवेत सामावून घेतले होते. ही बाब कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार समावेशनासाठी ना. मुनगंटीवार यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. ३३ जणांना नियुक्तीपत्र प्रदान केले. ४ वैद्यकीय अधिका-यांना सेवाप्रवेश नियम मंजूर झाल्यानंतर समावेशन हाेणार आहे.

समावेशन झालेले कर्मचारी

सरिता येरम, रंजना मडावी, उष्टा गेडाम, राधा पेंदोर, पिंकी पेंढारकर, छाया आरके, सतीश अलोणे, ललिता निखाडे, संगीता साने, विद्या कुडे, अमिता अलोणे, मनीषा गुरुनुले, सरिता लोखंडे, स्मिता काकडे, संगीता जगताप, वैशाली येलमुले, करुणा गोंगले, रुपा खिरटकर, वर्षा सातपुते, निर्मला पुडके, सारिका चवरडोल, किरण धर्मपुरीवार, इंदिरा सातपुते, प्रवीण गुळघाणे, सीमा चहारे, सुनील वारुलवार, नीलिमा ठेंगरे, नरेंद्र जनबंधू, शामल रामटेके, गणेश राखुंडे, रितिशा दुधे, अनिता कुडे, वैशाली मानोत यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते समावेशन नियुक्तीपत्र देण्यात आले.

Web Title: Inclusion in the health department, smiles on the faces of 33 contract employees of chandrapur municipal corp.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.