बल्लारपूरात घरफोडी, फसवणूकीच्या गुन्ह्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:52 AM2020-12-17T04:52:20+5:302020-12-17T04:52:20+5:30
अशा असामाजिक तत्त्व पासून कसे दूर राहावे आणि सावधगिरी बाळगावी याबाबत बल्लारपूर ते पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी जाहीर ...
अशा असामाजिक तत्त्व पासून कसे दूर राहावे आणि सावधगिरी बाळगावी याबाबत बल्लारपूर ते पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी जाहीर पथकातून ३० मार्गदर्शक सूचना नागरिकांना दिले आहेत. हे पत्रक सर्वत्र वाटप करण्यात आले आहे. घराला कुलूप लावून बाहेर गावी जाताना घेण्याची काळजी, नकली सोने विकणारे व पॉलिश करून देणारे यापासून सावध गिरी, मोबाईल वरून बक्षीस लागण्याच्या येणाऱ्या बातम्या, बँकेतून पैसे काढल्यानंतर त्याची काळजी, व्हाट्सअप वरून येणारे संदेश फॉरवर्ड करताना घेण्याची दक्षता इत्यादीबाबत कशी काळजी घेतली पाहिजे याबाबत सविस्तरपणे आणि फसवणूक झाल्यानंतर कुठे कशी धाव द्यायची याबाबत सूचना दिल्या आहेत. याबाबत महत्त्वाचे असे की ज्या ज्येष्ठ नागरिकांची मुलं खूप दुर परदेशी राहतात अशा एकट्या दुकट्या जोडप्यांनी आपली नावे पोलीस स्टेशनला द्यावी जेणेकरून त्यांची पोलीस वेळोवेळी भेट घेऊन त्यांना पोलिसाकडून मदत देता येईल.